भाषाभ्यास: व्याकरण घटकांवर आधारित कृती

The Correct Spelling (if your page shows different) is →


प्रश्‍नार्थी वाक्य

विधानार्थी वाक्य

आज्ञार्थी वाक्य

उद्गारार्थी वाक्य

विधानार्थी वाक्य

प्रश्‍नार्थी वाक्य

आज्ञार्थी वाक्य

उद्गारार्थी वाक्य

प्रश्‍नार्थी वाक्य

विधानार्थी वाक्य

यावर किती मनापासून हसला तो शालीन कवी!

लठ्ठपणा आपल्या हातात नसतो.

किती मोठं सामर्थ्य आहे मनाचं!

ते व्यक्तिमत्त्व प्रचंड स्फूर्तिदायक होतं.

तपोवनाकडे कोणीही जात नाही.

किती भुरळ पाडली मला या खेळाने!

स्टेशन इथून फारसं जवळ नव्हतं.

मनानं किती श्रीमंत होते तिथले शिक्षक!

त्यांना मी कधी विसरू शकेन का?

खरंच! किती आवडेल मला तुमच्याशी मैत्री करायला!

गौरव वाटणे – अभिमान वाटणे.
वाक्य: सैन्यात असताना मिळालेले वीरचक्र मिरवण्यात मेजर रावतेंना गौरव वाटे.

उसंत न लाभणे – मोकळा वेळ न मिळणे.
वाक्य: शाळा सुरू झाल्यापासून राघवला खेळासाठी उसंतच लाभत नव्हती.

सक्त ताकीद देणे – बजावून सांगणे.
वाक्‍य: पोलिसांनी चोरांना गावाच्या बाजूला फिरकायचेही नाही अशी सक्त ताकीद दिली.

वर्ज्य करणे – त्याग करणे, वगळून टाकणे.
वाक्‍य: विलासरावांना पथ्य म्हणून भात वर्ज्य करावा लागला.

खूणगाठ बांधणे – मनाशी निश्‍चित करणे.
वाक्य: शहरात मेहनतीवाचून पर्याय नाही याची अमितने खूणगाठ बांधली.

आनंद गगनात न मावणे – खूप आनंद होणे.
वाक्य: रमाला समोर पाहताच आईचा आनंद गगनात मावेनासा झाला.

नाव उज्ज्वल करणे – नाव उंचावणे.
वाक्य: रमेशने शौर्य पुरस्कार मिळवून घराण्याचे नाव उज्ज्वल केले.

हेवा वाटणे – मत्सर वाटणे.
वाक्‍य: गौतमीचे सौंदर्य पाहून अनेकांना तिचा हेवा वाटे.

भुरळ घालणे – आवड निर्माण करणे.
वाक्‍य: पुस्तकांनी जणू अमेयवर भुरळ घातली होती.

देहभान विसरणे – गुंग होणे.
वाक्‍य: रावसाहेब देहभान विसरून समाजसेवा करत होते.