उपयोजित लेखन: सारांशलेखन

सारांश
नवीन पिढीला मानवतेच्या सौंदर्याचा आस्वाद देण्यासाठी पालक व शिक्षकांबरोबरच पुस्तकेही तरल शब्दांदवारे प्रेरणा देतात. वाचक-लेखक प्रवास घडवणाऱ्या ग्रंथांचे ग्रंथपाल, ग्रंथसंस्कृतीचे पालनकर्ते ठरतात.

सारांश
धगधगत्या उन्हात पोपटी पालवी फुटलेली झाडे तेजपूर्ण हिरवीगार भासत आहेत. पिंपळाच्या झाडावरील लालसर हिरव्या रंगाच्या सळसळणाऱ्या पालवीने प्रत्येक डहाळी नटली आहे. उन्हाच्या तेजात न्हाऊन निघणारी ही चैत्रसंपदा म्हणजे डोळ्यांना, हृदयाला आनंद देणारा उत्सवच वाटतो.

सारांश
अनेकजण ‘आधी स्वार्थ मग परमार्थ’ वृत्तीमुळे खऱ्या नात्यांपासून दुरावतात. सोय, सुख, विचार, भावनांना प्राधान्य देणारी नातीच जपली जातात. यामुळे, नात्यांत गुंतून त्यात पूर्णपणे सामावण्यापासून आपण दुरावतो. खऱ्या नात्यांतील संवेदनांचे पदर मनाच्या एकात्मतेतून उलगडतात.

सारांश
धगधगत्या उन्हात पोपटी पालवी फुटलेली झाडे तेजपूर्ण हिरवीगार भासत आहेत. पिंपळाच्या झाडावरील लालसर हिरव्या रंगाच्या सळसळणाऱ्या पालवीने प्रत्येक डहाळी नटली आहे. उन्हाच्या तेजात न्हाऊन निघणारी ही चैत्रसंपदा म्हणजे डोळ्यांना, हृदयाला आनंद देणारा उत्सवच वाटतो.

error: Content is protected !!