उपयोजित लेखन: बातमी लेखन

खालील कृती सोडवा: [मार्च 2023] [5 Marks]
तुमच्या शाळेत ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन ‘ साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी लिहा.

शिवाजी विद्यालयात ‘शिक्षक दिन’ साजरा

दिनांक: ६ सप्टेंबर,२०२२
आमच्या वार्ताहराकडून,
मुंबई: येथील शिवाजी विद्यालयात काल शिक्षक दिन साजरा करण्यात आला. सकाळी १० वाजता शाळेच्या सभागृहात या कार्यक्रमाला सुरुवात झाली. मुख्याध्यापिका मा. सौ. सुनंदा पाटील यांनी दीपप्रज्वलन केले. यानंतर सरस्वतीदेवी व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या तसबिरीला हार घालण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त विद्याथ्यांनी ‘डॉ. सर्वपल्ली राघाकृष्णन’ तसेच ‘शिक्षकांचे महत्त्व’ या विषयांवर भाषणे केली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना भेटवस्तू, तसेच शुभेच्छाकार्ड दिले.
    शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. सुनंदा पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे, तसेच शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले. यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. दुपारी १२ वाजता या कार्यक्रमाची सांगता झाली.

खालील  निवेदन वाचून बातमी तयार करा.: [मार्च 2022] [5 Marks]

अभिनव विद्यालयात भव्य विज्ञान प्रदर्शन सोहळा संपन्न!

दिनांक:  19 ऑक्टोबर
आमच्या वार्ताहराकडून,
नागपुर: नागपुरातील अभिनव विद्यालयात ‘भव्य विज्ञान प्रदर्शन’ सोहळा संपन्न झाला. या विज्ञान प्रदर्शन सोहळ्यात एकूण 50 शाळांनी सहभाग नोंदवला होता. दि. 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर असे तीन दिवस हे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते.
      15 तारखेला सकाळी 11 वाजता या विज्ञान प्रदर्शनाचा उद्‌घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुहास माने आणि प्रमुख पाहुणे श्री. आशिष वाघ याप्रसंगी उपस्थित होते. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण केले. सौरऊर्जा, आरोग्य आणि सुदृढ शरीर, स्वच्छता हे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विज्ञान नाटिकासुद्धा सादर केली. प्रदर्शनाच्या अंतिम दिनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उत्कृष्ट विज्ञान प्रकल्पांना पारितोषिके देण्यात आलो.

खालील विषयावर बातमी तयार करा.  [डिसेंबर 2020] [5 Marks]

जीवनज्योत विद्यालयात मराठी
निबंधलेखनाची कार्यशाळा संपन्न!

दिनांक 17 डिसेंबर,
आमच्या प्रतिनिधीकडून,

         पिंपरी: पिंपरी, येथील जीवनज्योत विद्यालयात काल मराठी निबंधलेखनाची कार्यशाळा संपन्न झाली. सकाळो 10 ते संघ्याकाळी 5 पर्यंत चाललेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांसोबत अनेक नागरिकांनीही सहभाग घेतला. पुणे येथील आदर्श महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रमुख व मराठी भाषातज्ज्ञ श्रीमती मधुरा महाजन यांनी या कार्यशाळेत सहभागी असणाऱ्यांना मार्गदर्शन केले. निबंधलेखनात मुद्देसूद विचार कसे मांडावेत, प्रभावी लेखन कसे करावे, भाषा कशी असावी याबरोबरच नोटनेटकेपणा व सुवाच्य हस्ताक्षराचे महत्त्व या सर्व बाबींबद्दल त्यांनी सविस्तर चर्चा केली.

       आज अनेक ठिकाणी मुलांमध्ये लिहिण्याची व खास करून मराठीमध्ये लिहिण्याची आवड कमी होत चाललेलो असतना या कार्यशाळेला मिळालेला उत्तम प्रतिसाद आशादायी होता, असेही श्रीमती महाजन यांनी नमूद केले. जोवनज्योत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कविता नारखेडे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यशाळेची सांगता झाली.

खालील निवेदन वाचून बातमी तयार कराः  [मार्च 2020] [5 Marks]

भव्य वार्षिक क्रीडामहोत्सव संपन्न!
स्पर्धांबरोबरच उद्घाटन सोहळा ठरला आकर्षण

दिनांक 14 जानेवारी,
आमच्या खास प्रतिनिधीकडून,
सोलापूर : सोलापूरमधील साने गुरुजी विद्यालयाचा 40 वा वार्षिक क्रोडामहोत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या या क्रीडामहोत्सवाला प्रमुख पाहुण्या म्हणून मा.सो. अपर्णा भोसले यांना निमंत्रित करण्यात आले होते, तर सोहळ्याचे उद्घाटन अध्यक्ष मा. श्री. रोहित बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी सादर केलेल्या हलगीवरील लेझीम नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर सादर केलेल्या सांगीतिक कवायतीने तर प्रेक्षकांना वेड लावले. इयत्ता 9 वी च्या विद्यार्थ्यांनी मल्लखांबाचे प्रकार सादर केले. इयत्ता 5 वी व 6 वीच्या विद्यार्थ्यांनी क्रिकेट बॅट, हॉकी स्टिक, फुटबॉल यांचा वापर करून सादर केलेले नृत्य मनोरंजक होते. मा. सौ. अपर्णा भोसले यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे व पालकांच्या उपस्थितीमुळे सर्वच विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा व खेळांमध्ये जिद्द, चिकाटी दाखवून खेळ केला. शेवटी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते बक्षीस समारंभ झाल्यावर विद्यार्थी प्रमुख कुमारी अहानाने उपस्थितांचे आभार मानले.

खालील मुद्‌दे वाचा व त्याखालील कृती सोडवा: [JULY 2019] [5 Marks]

विज्ञान दिनानिमित्त आयोजित प्रदर्शन सोहळ्याची बातमी तयार करून लिहा.

छोट्या वैज्ञानिकांच्या वैज्ञानिक साहित्याचे प्रदर्शन
‘विज्ञानदिन’ सोहळा उत्साहात संपन्न

दिनांक 1 मार्च,
आमच्या प्रतिनिधीकडून,

भंडारा : येथील बजाजनगर येथील शारदा विद्यालयात विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे 28 फेब्रुवारी ह्या दिवशी विज्ञानदिन उत्साहात साजरा केला. विज्ञानदिनानिमित्त विविध शाळांतील वैज्ञानिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन आदर्श विद्यालयातर्फे करण्यात आले होते. जिल्ह्यातील डी.पी. महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विलास बोधनकर यांच्या हस्ते सदर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. बोधनकर यांनी प्रदर्शनातील विविध साहित्य पाहिल्यानंतर ते तयार करणाऱ्या विदयार्थ्यांचे कौतुक केले. सकाळो 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे वैज्ञानिक साहित्य प्रदर्शन सर्वांसाठी खुले होते. विविध विज्ञानोपयोगी साहित्याची माहिती घेण्यासाठी भंडारा येथील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी सदर प्रदर्शनास भेट दिली. अशा प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो व त्यांच्या विचारांना नवी दिशा मिळते, असे मत याप्रसंगी अनेक पालकांनी व्यक्‍त केले.

Extra for Practice (Not from Question Bank)

खालील विषयावर बातमी तयार करा.
विषय: राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू केली.

 प्लास्टिक बंदी 

दि. २० मार्च, २०१८

वार्ताहार,  मुंबईः  काल (१९ मार्च) राज्य सरकारने सर्व राज्यभर प्लास्टिक बंदी लागू केल्याची घोषणा केली. आमच्या प्रतिनिधींनी काही जबाबदार नागरिकांची भेट घेतली व त्यांची या विषयीची मते व प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी आपल्या प्रतिक्रियांमध्ये आनंद, नाराजी व चिंता व्यक्‍त केली.
       प्लास्टिकमुळे प्रदुषणात वाढ झाल्याने नागरिकांच्या व शहरांच्या स्वास्थ्याबाबत व स्वच्छतेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचे उत्तर या बंदीने मिळाल्याचे काही नागरिक म्हणाले. तसेच प्लास्टिकपासून होणाऱ्या हानीबाबत जनतेचे प्रबोधन करायला हवे, जागरूकता निर्माण व्हावी असेही जाणकार म्हणतात. सरकारचा निर्णय
योग्यच आहे. ‘देर आये दुरूस्त आये’ असे त्यांचे म्हणणे आहे. व्यापारी वर्गात नाराजी व चिंता दिसून आली. सरकारने प्लास्टिकला पर्याय न देताच तडका फडकी बंदी लागू केल्याने धंदा मंदावला असे त्यांचे म्हणणे आहे.
       सरकारच्या आरोग्य खात्याने याची गंभीर दखल घेऊन, कायद्यातील तरतुदींचा विचार करूनच अंमलबजावणी करावी, असेही काही नागरिकांनी सुचवले आहे.

खालील विषयावर बातमी तयार करा.
विषय: सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग ठाणे आयोजित “आरोग्य, स्वच्छता व हितगुज मेळावा”

सर्व शिक्षा अभियान – हितगुज मेळावा 

दि. २ मार्च, २०१७

वार्ताहार,  सरस्वती विद्यालय, ठाणे: सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग ठाणे, यांच्या वतीने ठाणे येथील सरस्वती महाविद्यालयाच्या भव्य पटांगणात जागतिक महिला आरोग्य दिनाच्या निमित्ताने दिनांक २७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत सर्व शाळातील इयत्ता ८ बी ते १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी ‘आरोग्य, स्वच्छता व हितगुज मेळाव्याचे’ आयोजन केले होते. तीन दिवस चाललेल्या या मेळाव्याचे उद्‌घाटन ठाणे तालुक्‍याचे आमदार बाळासाहेब देखणे यांनी केले. 
        तीन दिवस चाललेल्या या मेळाव्यात कुशल व नामवंत डॉक्टरांनी विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले. किशोरवयीन मुलींचे व्यक्तिमत्त्व विकास, आहार, आरोग्य तसेच वैयक्तिक स्वच्छता, निरोगी शरीर, मन:शांती, योग, हलके व सहज करता येणारे व्यायाम, चांगल्या सवयी व नियमितपणाचे महत्त्व या विषयांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी उचित मार्गदर्शन केले. मेळाव्यात सहभागी विद्यार्थिनींची रक्‍त तपासणीही करण्यात आली. अनेक स्पर्धांचे व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले. स्पर्धेतील विद्यार्थिनींचा सहभाग व उत्साह लक्षवेधी होता. भोजन व निवासाची उत्तम सोय करण्यात आली होती.
        मेळाव्याच्या शेवटच्या दिवशी स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बक्षीसे व प्रमाणपत्र देण्यात आली. सुप्रसिद्ध लेखिका सो. स्वप्नाली कर्णिक यांनी सर्वांचे आभार मानले व विद्यार्थिनींचे कौतुक करून आरोग्याची काळजी घेण्याबाबत सूचनाही दिल्या. तसेच त्यांनी शिक्षण विभागाच्या या चांगल्या कार्याचे तोंड भरून कौतुक करून सर्वांचे आभार मानले. उत्साहात, आनंदात व जोशात या कार्यक्रमाची सांगता झाली.

खालील विषयावर बातमी तयार करा.
विषय: (शीर्षक) वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम वनाधिकारी मा. श्री. शशिकांत राव यांच्या उपस्थितीत संपन्न.

भव्य वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम 

दि. २१ जून, २०१८

वार्ताहार, वसई: वसई येथील ‘राजमाता ताराराणी’ विद्यालयाच्या वतीने दिनांक २० जून, २०१८ रोजी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त शाळेच्या भव्य पटांगणात वृक्षारोपण व वृक्षदिंडीचा कार्यक्रम, वसई जिल्हा, वनविभागाचे मुख्य वनाधिकारी माननीय श्री. शशिकांत राव यांच्या हस्ते संपन्न झाला.
        वसुंधरा दिनाचे औचित्य साधून ‘राजमाता ताराराणी’ विद्यालयाने शाळेच्या आवारात व गावात ५ ० ० रोपे लावण्याचा उपक्रम राबवला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व गावकरी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे श्री. शशिकांत राव यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण सोहळा साजरा झाला. त्यानंतर मुख्याध्यापक, शिक्षक व काही गणमान्य नागरिकांनीही वृक्षारोपण केले. अध्यक्षीय भाषणात अध्यक्षांनी वनांचे वृक्षांचे महत्त्व वर्णन केले. वृक्षारोपण का आवश्यक आहे ते ही सांगितले.
       त्यानंतर पालखीत अनेक वृक्षरोपे ठेवून विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी वक्षदिंडीत मोठ्या उत्साहाने भाग घेतला. विद्यार्थ्याच्या हातात वृक्षांचे महत्त्व सांगणारे फलक होते. दिंडीच्या पुढे शाळेचे लेझीम पथक होते. काही विद्यार्थ्यांनी डोक्यावर वृक्षांची रोपे घेऊन दिंडीत सहभाग घेतला होता. दिंडी शाळेतून निघून, श्रीकृष्ण बागेपर्यंत गेली. वाटेत नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी दिंडीचे स्वागत केले. यावेळी अनेकांना वृक्षरोपे वाटली गेली. दुपारी दिंडी परत शाळेत आल्यानंतर आभार प्रदर्शन व मुलांनाही रोपे व खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

खालील विषयावर बातमी तयार करा.
विषय: डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’. म्हणून साजरा.

वाचन प्रेरणा दिन 

दि. ९६ ऑक्टोबर, २०१७

वार्ताहार, रामनगर: रामनगर ता. १५ ऑक्टोबर रोजी-मराठी ग्रंथ संग्रहालय व वाचनालयातर्फे रामनगर येथे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचना प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून ग्रंथालयाने अनेक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरूवात सुप्रसिद्ध लेखक श्री. जयवंत लेले यांच्या हस्ते सरस्वती व अब्दुलकलाम यांच्या फोटोंना पुष्पहार घालून करण्यात आली.
           त्यावेळी विद्यार्थ्यांसाठी व प्रौढांसाठी उत्कृष्ट वाचक वाचन स्पर्धा घेण्यात आली. यात स्पर्धकांनी कथा, कविता व लेखांचे वाचन केले. या स्पर्धेत कु. शरद पोळ या विद्यार्थ्यांस व श्री गजानन वामन शेलार यांस उत्तम व उत्कृष्ट वाचक म्हणून प्रथम पारितोषिक देण्यात आले.
           वाचनाचे महत्त्व कळावे व वाचन संस्कृतीचा विकास व्हावा म्हणून ग्रंथालय प्रयत्न करणार असल्याचे ग्रंथालयाच्या अध्यक्षांनी सांगितले. प्रमुख पाहुण्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजकांचे व सहभागी आणि विजेत्या स्पर्धकांचे कौतुक केले. एक हजार पुस्तके आपण ग्रंथालयाला देणगी देणार असल्याचेही घोषित केले. आभार प्रदर्शना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

खालील विषयावर बातमी तयार करा.
विषय: शिक्षक दिन कार्यक्रम. / डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ आयोजित शिक्षक दिन कार्यक्रम .

शिक्षकदीनाचा उत्साह 

दि. ६, सप्टेंबर, २०१७

वार्ताहार, वासुदेव बळवंत फडके विद्यालय, सावंतवाडी: सावंतवाडी येथील वासुदेव बळवंत फडके विद्यालय ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन’ यांच्या स्मरणार्थ शिक्षकदिन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करून विद्यार्थ्यांनी डॉ. राधाकृष्णन व आपल्या शिक्षकांविषयी आदर आणि कृतज्ञताभाव व्यक्‍त केला. याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. नाईकसरांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यादिवशी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शिक्षक होऊन दोन्ही सत्रात उत्तम प्रकारे शाळा चालवली. शिक्षकांनी शिक्षकदिनाच्या दिवशी शिकवण्याचे तास न घेता आपल्या विद्यार्थी शिक्षकांच्या कामाचे अवलोकन केले.
         सर्व विद्यार्थ्यांच्या उत्साह व आनंदाला उधाण आले होते. नवीन शिक्षक त्यांना न रागावता व ओरडता शिकवत होते. मुलेही मनात येणारे कोणतेही प्रश्‍न विचारून नव्या शिक्षकांच्या ज्ञानाची व संयमाची परीक्षा घेत होती. मुख्याध्यापकांपासून शिपायांपर्यंत सर्व कामे विद्यार्थ्यानीच केली. शाळेच्या भव्य सभागृहात शिक्षक व विद्यार्थी एकत्र जमले. आजच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण व सूत्रसंचालनही विद्यार्थी- शिक्षकांनीच केले. मुख्याध्यापक व इतर शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा गुणगौरव करणारी भाषणे केली. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन यांना पुष्पमाला अर्पण केल्यानंतर सर्व उपस्थित शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व शिक्षकांनीही सर्व विद्यार्थी-शिक्षकाचे तोंड भरून कौतुक केले. यशवंत व्हा, गुणवंत व्हा आणि उत्तम अभ्यास करून सफल व्हा! असा मोलाचा सल्लाही दिला. विद्यार्थी-शिक्षक व शिक्षक यांच्या एकत्रित चहा-फराळाच्या कार्यक्रमाने या उपक्रमाची सांगता झाली.

खालील विषयावर बातमी तयार करा.
विषय:  महात्मा गांधी जयंती, वर्धा (सेवाग्राम) येथे रांगोळीतून बापूंच्या जीवनातील खास प्रसंगांना उजाळा

महात्मा गांधी जयंती 

दि. ४, ऑक्टोबर २०१८

आमच्या वार्ताहराकडून, वर्धा (सेवाग्राम):  राष्ट्रपिता माहात्मा गांधी यांचे तत्त्वज्ञान आणि कार्याची दखल जगातील विचारवंतांनी घेतली आहे. युवा कलाकारांनी रांगोळीच्या माध्यमातून गांधीजींच्या जीवनातील महत्त्वपुर्ण प्रसंग साकारीत महात्मा गांधीजींना आदरांजली अर्पण केली आहे. गांधी प्रेमींसाठी ही अपूर्व भेट राहणार आहे. गांधी जयंतीनिमित्त देशविदेशात विविध कार्यक्रम होणार आहेत. काही ठिकाणी त्याची सुरुवातही झाली आहे. २ ऑक्टोबरला सेवाग्राम आश्रमात मोठ्या संख्येने राजकीय नेते, पर्यटक आणि गांधी विचारांना मानणारा वर्ग नतमस्तक होण्यासाठी आला होता. रांगोळी कलाकृतींमध्ये गांधीजींचे दक्षिण आफ्रिका, भारतातील सत्याग्रह, प्रमुख नेत्यांशी वार्तालाप आदी प्रसंग आणि जीवनशैली साकारले आहेत. रांगोळी प्रदर्शन सर्वनामान्य नागरिकांना १० ऑक्टोबरपर्यंत बघता येणार आहे.

error: Content is protected !!