हो. मी लेखकाच्या या मताशी सहमत आहे. लेखकाने डाएट सुरू करायचा निर्धार व्यक्त करताच चाळीतल्या लोकांनी त्यांनी काय खाऊ नये याची ढीगभर मोठी यादीच समोर मांडली. व्यक्ती तितक्या प्रवृत्तीप्रमाणे प्रत्येक शेजाऱ्याने एक वेगळा पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे, नक्की जगण्यासाठी काय खावे असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच होते. प्रत्येकाची मते शांतपणे ऐकून घेऊन लेखकाने मात्र स्वत:च स्वत:चे आहारव्रत सुरू करण्याचा निर्णय घेतला. एक ना धड भाराभर चिंध्या होण्यापेक्षा स्वत: विचार करून, वाचन करून, माहिती मिळवून योग्य प्रकारे आहारव्रत पार पाडण्याचा लेखकांचा हेतू येथे स्पष्ट होतो. त्यामुळे, हवी तशी मतं मांडणाऱ्या शेजाऱ्यांच्या विचारांना न जुमानता स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचा लेखकाचा निर्धार मला पटतो.