
काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्परसंबंधांत बदल होतात. हे बदल अपरिहार्य असतात. ते व्युत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून समजून घेणे सहज शक्य होते. बऱ्याच वेळा भाषेत एक शब्द विविध अर्थांनी वापरला जातो. शब्दाची मूळ व्युत्पत्ती एका अर्थाची असली तरीही कालओघात या शब्दांना वेगळा अर्थ प्राप्त होऊन तो प्रचलित होतो. पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेत स्थिरावतो.
उदा. ‘शहाणा’ या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चालाख असा होता. या शब्दाची ‘सज्ञान’ या शब्दावरून व्युत्पत्ती झाली असावी. आता मात्र ‘शहाणा’ या शब्दाचा ‘अतिशहाणा’ असा अर्थही रूढ होत आहे.
अनेक वेळा समान दिसणाऱ्या शब्दांचेही वेगवेगळे अर्थ आपणांस भाषेत गवसतात. मग प्रसंगाला आणि वाक्याला अनुसरून त्यांचा अर्थ लक्षात घ्यावा लागतो.
उदा. ‘तार’ या शब्दाचा एक अर्थ धातूचा पातळ धागा, तर दुसरा अर्थ ‘पूर्वीच्या काळी त्वरेने संदेश पाठवण्याचे साधन’ असा होतो.
अशाप्रकारे, भाषेमधील अनेक बारकावे, काळानुरूप तिच्यात झालेले बदल जाणून घेण्यासाठी व्युत्पत्ती कोश उपयुक्त ठरू शकतो.

व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे हे व्युत्पत्ती कोशाचे कार्य होय. व्युत्पत्ती कोशाचे कार्य हे प्रामुख्याने चार प्रकारचे असते, ते पुढीलप्रमाणे:
i.शब्दाचे मूळ रूप दाखवणे: भाषेतील बदलत गेलेल्या शब्दांचे मूळ आपल्याला व्युत्पत्ती कोशाच्या माध्यमातून शोधता येते. उदाहरणार्थ, मराठी भाषेतील ‘आग’ हा शब्द संस्कृतमधील ‘अग्नि’ या शब्दापासून आला आहे.
ii.अर्थांतील बदल स्पष्ट करणेः काळानुसार, शब्दांच्या स्वरूपात, अर्थात व त्यांच्या परस्परसंबंधात बदल होतात. काहीवेळा मूळ अर्थासोबतच अधिकचा एखादा अर्थ त्या भाषेत रूढ होतो. उदा. व्युत्पत्ती कोशानुसार शहाणा म्हणजे हुशार, बुद्धिमान; पण सध्या ‘शहाणा’ म्हणजे ‘अतिशहाणा’ हा अर्थदेखील रूढ होत आहे. समान दिसणाऱ्या शब्दांचे वेगवेगळे अर्थदेखील व्युत्पत्ती कोशातून उलगडतात. उदा. पाठ. शरीराचा अवयव किंवा पुस्तकातील धडा.
iii.उच्चारातील बदल व फरक दाखवणे: एखाद्या शब्दाचे मूळ रूप, त्याचा इतिहास, अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे हेही व्युत्पत्ती कोशात दाखवलेले असते. उदा. दीपावली हा मूळ संस्कृत शब्द; मराठीत त्याचा दिवाळी हा शब्द बनला आहे.
iv.बदलांचे कारण स्पष्ट करणे: भाषेत बदल होण्यामागे बहुतेकदा सुलभीकरणाची म्हणजेच सोपे करण्याची प्रवृत्ती असते किंवा कोणत्याही दोन भाषा बोलणारे भाषिक एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होते. या सर्व बदलांमागच्या कारणांची नोंद व्युत्पत्ती कोशाचे कार्य आहे.

व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे हे व्युत्पत्ती कोशाचे कार्य होय. प्रारंभीची भाषा काळाच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत गेली. आताचे तिचे स्वरूप पूर्वीच्या भाषेहून पूर्णपणे भिन्न आहे. हे परिवर्तन लक्षात घेण्याकरता, शब्दांच्या निर्मितीमागील रहस्य शोधण्याकरता, त्या शब्दांमागील अर्थांचे पदर उलगडण्याकरता, भाषेचा आनंद घेण्याकरता व भाषा सखोलपणे आत्मसात करण्याकरता व्युत्पत्ती कोशाची आजच्या युगात आवश्यकता भासते. भाषेतील बदलत गेलेल्या शब्दांचे मूळ आपल्याला व्युत्पत्ती कोशाच्या माध्यमातून शोधता येते. उदाहरणार्थ, मराठी भाषेतील ‘आग’ हा शब्द संस्कृतमधील ‘अग्नि’ या शब्दापासून आला आहे.
काळानुसार, शब्दांच्या स्वरूपात, अर्थात व त्यांच्या परस्परसंबंधांत बदल होतात. काहीवेळा मूळ अर्थासोबतच अधिकचा एखादा अर्थ त्या भाषेत रूढ होतो. उदा. व्युत्पत्ती कोशानुसार शहाणा म्हणजे हुशार, बुद्धिमान; पण सध्या ‘शहाणा’ म्हणजे ‘अतिशहाणा’ हा अर्थदेखील रूढ होत आहे. समान दिसणार्या शब्दांचे वेगवेगळे अर्थदेखील व्युत्पत्ती कोशातून उलगडतात. उदा. पाठ. शरीराचा अवयव किंवा पुस्तकातील धडा.
एखाद्या शब्दाचे मूळ रूप, त्याचा इतिहास, अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे हेही व्युत्पत्ती कोशात दाखवलेले असते. उदा. दीपावली हा मूळ संस्कृत शब्द; मराठीत त्याचा दिवाळी हा शब्द बनला आहे.
भाषेत बदल होण्यामागे बहुतेकदा सुलभीकरणाची म्हणजेच सोपे करण्याची प्रवृत्ती असते किंवा कोणत्याही दोन भाषा बोलणारे भाषिक एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होते. या सर्व बदलांमागच्या कारणांची नोंद व्युत्पत्ती कोशात असल्याने भाषाभ्यास करताना व्युत्पत्ती कोशाची आवश्यकता भासते.