पाठ ८. उर्जाशक्तीचा जागर (Marathi Question Bank Solution)

प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक कोण असते ?

प्रत्येक व्यक्‍तीच्या आयुष्यात शिक्षकांचं महत्त्वपूर्ण स्थान असतं. कुंभार मातीला चांगला आकार देत सुबक मडकी घडवतो, त्याचप्रमाणे माझ्या शिक्षकांनी माझ्यावर चांगले संस्कार करत मला घडवलं. अजूनही घडवत आहेत. ते मला उत्तम मार्गदर्शन करतात. शिक्षकांनी दिलेला अभ्यासाचा, शिस्तीचा, चिकाटीचा मंत्र जपत मी चाललो आहे. जीवनात चांगला माणूस व्हायचं आहे. क्रीडाक्षेत्रात आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्याचं माझं स्वप्न आहे आणि त्यात मला नक्कीच यश मिळेल हा विश्‍वासही मला माझ्या शिक्षकांमुळेच मिळाला आहे.

भिंगाच्या साहाय्याने सूर्यकिरणांची शक्‍ती कागदावर एकत्र केल्याने कागद जळाला.

लेखकाची आई, त्याचे शिक्षक आणि त्याची शाळा ही लेखकाची संस्कार केंद्रे होती.

प्रत्येक मुलाला जगातील इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा आई जास्त जवळची असते. बाळ अगदी पोटात असल्यापासूनच ती बाळावर गर्भसंस्कार करत असते. त्यानंतरही जन्माला आल्यावर बाळाला बाहेरच्या जगाची ओळख आई करून देते. त्या बालकाची भाषा समजून घेऊन तो त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करते, संस्कार करते. अगदी शब्द उच्चारण्यापासून ते पहिले पाऊल टाकेपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत आई हीच बाळाची शिक्षिका असते. आईचे आचरण, तिचे विचार, तिच्या आवडीनिवडी या साऱ्यांतूनही बाळावर संस्कार घडत असतात, आयुष्यातील चांगल्या-वाईट गोष्टींतील फरक तीच आपल्या बाळास समजावून देते. त्यामुळेच, ‘आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते’ हे विधान योग्यच आहे.