पाठ १२. रंग मजेचे रंग उद्याचे

i.   जेव्हा आभाळातून वृष्टी होईल.
ii.  जेव्हा डोंगरांवर बिया उधळल्या जातील.

दाट ताटवे विविधरंगी फुलांचे आहेत.

मने हिरव्या रंगाची असावीत.

पावसात न्हाऊन निघालेली, जणू हिरवा शालू नेसलेली वसुंधरा (पृथ्वी) दिवसेंदिवस कुरूप होत चालली आहे. प्रगतिच्या नावाखाली तिचे सौंदर्य ओरबाडले जात आहे. तिचे हिरवेपण जपण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात वृक्षारोपण/वृक्षलागवड आणि वृक्षसंगोपन करण्याची खूप आवश्यकता आहे.
      केवळ ‘झाडे लावा’ असे म्हणून चालणार नाही, तर लावलेली झाडे ‘जगवा’ असे म्हणावे लागेल. त्याकरता प्रत्येकाने आपल्या नावाने किंवा आपल्या प्रिय व्यक्‍तीच्या नावाने एकतरी झाड लावून जोपासले पाहिजे. तसेच, झाडापासून बनवलेल्या प्रत्येक वस्तूचा व निसर्गातील साधनसंपत्तीचा जपून व काटकसरीने वापर केला पाहिजे. उदाहरणार्थ, कागद. कागद बनवण्यासाठी झाडे कापावी लागतात. त्यामुळे, कागदाचा योग्य तेवढा वापर करायला हवा किंवा उसाच्या चिपाडापासून बनवलेल्या पर्यायी कागदाचा वापर करून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी व्हायला हवे.
      तसेच, वनांसाठी राखीव जागा ठेवणे, इमारतींच्या आवारात शाळा-महाविद्यालयांत झाडे लावणे, पाण्याचा थेंब न्‌ थेंब जपून वापरण्यासाठी कार्यशाळा राबवणे असे उपक्रम घेता येतील. पर्यावरण संवर्धनाशी संबंधित स्पर्धा आयोजित करून लोकसहभागातून वसुंधरेचे संवर्धन व संगोपन करण्याकरता पुढाकार घेता येईल, असे मला वाटते.

कवयित्री अंजली कुलकर्णी

कवितेचा विषय- निसर्गाचे आपल्या आयुष्यातील स्थान व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व

जागतिकीकरणाच्या काळात जगणाऱ्या माणसाने निसर्गाशी, मातीशी असलेला आपला जिव्हाळ्याचा संबंध तोडू नये, त्यासाठी पर्यावरणाची जोपासना करावी, निसर्गाचे संवर्धन करावे व निसर्गाच्या विलोभनीय सौंदर्याचा आस्वाद घ्यावा असा संदेश ‘रंग मजेचे रंग उद्याचे’ या कवितेतून मिळतो.

या कवितेद्वारे कवयित्री अगदी साध्यासोप्या भाषेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश वाचकांच्या मनात रुजवते. पर्यावरणाची जोपासना कशी करावी यासंबंधीचे उपाय ती कवितेच्या माध्यमातून स्पष्ट करते. ती धरणीला ‘काळी आई’ म्हणते, पानांच्या सळसळीला ‘गर्भरेशमी’ असा शब्द वापरते. या छोट्या; पण अर्थपूर्ण शब्दांची गुंफण केल्यामुळे कविता सुंदर झाली आहे. कविता वाचताना उत्साह, सकारात्मकता जाणवते. ही कविता लयबद्ध आहे. त्यामुळे, ती गाताना वेगळाच आनंद मिळतो. म्हणून, मला ही कविता फार आवडते.

संगणक धान्य पिकवू शकत नाही, त्यामुळे आपल्याला धान्य पुरवणाऱ्या काळ्या मातीचे संवर्धन करू. मातीत ज्या शेतकऱ्यांचे हात राबतात त्यांना अधिक बळकट बनवू.

१. नजर                                        २. हस्त, कर
३. तरू, झाड                                ४. संपत्ती