वाक्याचे प्रकार

१. विधानार्थी वाक्य –
ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते. त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा .
मी आंबा खातो.
गोपाल खूप काम करतो.
ती पुस्तक वाचते.

२. प्रश्नार्थी वाक्य –
ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. होय किंवा नाही अशा प्रकारचे उत्तर येणारे प्रश्‍न किंवा कधी, कुठे, कसे, किती, कोण, कोणी, कोणास, काय याप्रकारचे प्रश्‍न यात विचारले जातात. वाक्याच्या शेवटी प्रश्‍नचिन्ह असेल, तर ते निश्‍चितपणे प्रश्‍नार्थी वाक्य असते.
उदा.
तू आंबा खल्लास का?
तू कोणते पुस्तक वाचतोस?
कोण आहे तिकडे?

३. उद्गारार्थी वाक्य –
ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो. त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. आपल्या मनात आलेली भावना खूप तीव्र, उत्स्फुर्त असेल, तर ती उद्गार रूपाने बाहेर पडते. आनंद, दुःख, आश्‍चर्य, भीती, कौतुक अशा भावना उद्गार रूपाने या वाक्यांत व्यक्‍त होतात. या वाक्यात उद्गारचिन्हाचा वापर केला जातो. 
उदा.
अबब ! केवढा मोठा हा साप
शाब्बास ! SSC पास झालास

४. आज्ञार्थी वाक्य –
ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थन ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.
तो दरवाजा बंद कर (आज्ञा)
देव तुझे भले करो (आशीर्वाद)
कृपया शांत बसा (विनंती)
देवा माला पास कर (प्रार्थना)
प्राणिमात्रांवर द्या करा (उपदेश)

५. होकारार्थी वाक्य –
ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य म्हणतात .
उदा .
माला अभ्यास करायला आवडते.
रमेश जेवण करत आहे.
माला SSC ची परीक्षा पास व्हयची आहे.

६. नकारार्थी वाक्य –
ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.
मी क्रिकेट खेळत नाही.
मला कंटाळा आवडत नाही.