वाक्य प्रचार (Class 10)

वाक्य प्रचार [(विभाग -४ भाषाभ्यास) 4 Marks]

Click the question to check your answer

संतवाणी (अ) योगी सर्वकाळ सुखदाता

अर्थ:  दर्जा घसरणे
वाक्य : रिलायंस कंपनीत अध:पतन होण्याची आशंका आहे.

अर्थ:  जन्म घेणे
वाक्य : कधी-कधी एखादा महात्मा या पृथ्वीवर जन्म पावतो.

पाठ ३ : शाल

अर्थ:  हरवणे
वाक्य : बाबांनी दिलेले किमती पेन राहुल गमावून बसला.

अर्थ:  फेरफटका मारणे
वाक्य : कुत्र्याला सकाळी चक्कर मारायला खूप आवडते.

अर्थ:  वेळ मिळणे
वाक्य : काम लवकर संपला म्हणून आईला थोडी उसंत मिळाली.

पाठ ४ : उपास

अर्थ:  आपण होऊन संकट ओढवून घेणे
वाक्य : राकेशने मधमाशांच्या पोळ्यात हात घातला म्हणजे हात दाखवून अवलक्षण केला.

अर्थ:  एखादा बेत उधळून लावणे
वाक्य : राकेशच्या मूर्खपणामुळे संपूर्ण योजनेला सुरुंग लागली.

अर्थ:  खूप संताप येणे
वाक्य :
गाडी चोरीला गेल्याने राकेशच्या अंगाचा तिळपापड झाला

पाठ :६ चुडीवाला

अर्थ:  दया येणे
वाक्य :
भिकाऱ्याची अवस्था पाहून राकेशला त्याची कीव आली.

अर्थ:  भीड वाटणे
वाक्य :
आपण नापास झालो हे सांगताना मला संकोच वाटला.

अर्थ:  मदत मिळणे
वाक्य :
गरीबांना मदत करण्यासाठी लोकांनी हातभार लावला.

अर्थ:  नमस्कार करणे
वाक्य :
परीक्षेला जाताना राकेशने आईच्या पायांना स्पर्श केला.

अर्थ:  हट्ट धरणे
वाक्य :
राकेशने मोबाईल फोन पाहिजे असा आग्रह धरला.

अर्थ:  आयुष्याचे मोल देणे
वाक्य :
लाखो जवानांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले.

अर्थ:  आवाजाने गोंधळ करणे
वाक्य :
माकडाला पाहण्यासाठी मुलांनी गलका केला.

पाठ : ७ फूटप्रिन्टस

अर्थ:  हीन दर्जाचे वाटणे
वाक्य :
कोणतेही काम करणे कमीपणाचे वाटता कामा नये.

अर्थ:  भ्रम होणे
वाक्य :
खिडकीत कोणीतरी आहे असा राकेशला भास झाला.

अर्थ:  शांत होणे
वाक्य :
बाबा रागावून बोलले, तेव्हा राकेश वरमला.

अर्थ:  शरम वाटणे
वाक्य :
राकेशची चोरी पकडली गेली तेव्हा त्याचा चेहरा पडला.

अर्थ: आश्चर्याने पाहणे
वाक्य :
माथेरानच्या सुंदर दृश्याकडे राकेश आ वासून पाहत राहिला.

अर्थ: सोया नसणे 
वाक्य : दुसऱ्यांना आपल्या कामात चुका काढण्याचा वाव देऊ नये.

पाठ : ८ ऊर्जाशक्तीचा जागर

अर्थ: मुकाबला करणे 
वाक्य : 
आलेल्या संकटांचा नेहमी धैर्याने सामना करावा.

अर्थ: आवड लावणे. 
वाक्य : 
काकांनी मला मराठी भाषेची गोडी लावली.

अर्थ: हिंमत न हारणे. 
वाक्य : 
कठीण परिस्थितीत माणसाने धीर सोडू नये.

अर्थ: भीतीने शहारा येणे.
वाक्य : 
रात्रीच्या वेळी जंगलातून एकटाच जाताना राकेशच्या अंगावर काटा उभा राहिला.

अर्थ: चकित होणे.
वाक्य : 
भारतीय स्त्रियांची बुद्धी पाहून मी अगदी थक्क होऊन गेलो.

अर्थ: मनावर प्रभाव पडणे.
वाक्य : 
जादूचे खेळ पाहून मुले भारावून गेली.

पाठ : १० रंग साहित्याचे

अर्थ:  कुतूहल वाढणे.
वाक्य :
आई पहिल्यांदाच विमानात बसणार होती, त्यामुळे तिची उत्कंठा वाढली.

अर्थ:  गुंगून जाणे.
वाक्य :
राकेश चित्र काढण्यात अगदी रममाण होता.

अर्थ:  चाल देणे.
वाक्य :
त्या कवितेत स्वरसाज चढवलं आहे, ती सुंदरतेने भरलेली आहे.

अर्थ:  जाणीव ठेवणे.
वाक्य :
तरूण पीढ़ीने मोठ्यांशी बोलताना वयेचे भान ठेवावे.

अर्थ:  सहकार्य करणे.
वाक्य :
हातात हात घालून काम करण्याने सर्वांची प्रगती होते.

अर्थ:  विनंती करणे.
वाक्य :
मुलाच्या सुखासाठी आईने सर्वांकडे आर्जव केला.

अर्थ:  निश्‍चय करणे.
वाक्य :
मोठेपणी गायक होण्याची राकेशने ठाम खूणगाठ बांधली होती.

पाठ : ११ जंगल डायरी

error: Content is protected !!