पाठ १३. हिरवंगार झाडासारखं

वातावरणातील बाष्पाला थंड हवा लागताच त्याचे पाण्याच्या थेंबांत रूपांतर होते. त्याला दव असे म्हणतात. जेव्हा पानांचे रूपांतर कागदात होते तेव्हा त्या पानांवरील दवबिंदू जणू अक्षरे बनून वहीच्या पानावर अलगद उतरतात.

i)  गीत           ii) वृक्ष, तरू
iii) वधू          iv) पाखरू, खग

वरील काव्यपंक्ती ही जॉर्ज लोपीस यांच्या ‘हिरवंगार झाडासारखं’ या कवितेतील आहे. सहनशीलता, परोपकारी वृत्ती, नेहमी सर्वांना भरभरून देत राहण्याचा दानीपणाचा गुण, कठीण प्रसंगांतही न डगमगता पाय रोवून राहण्याचा खंबीरपणा हे झाडाचे गुण आपणही आपल्यामध्ये आणावेत असा संदेश कवी देत आहे.
      झाडांच्या अनेक परोपकारांपैकी आणखी एक परोपकार म्हणजे झाडांपासून होणारी कागदनिर्मिती. जेव्हा झाडाच्या पानांचे रूपांतर कागदात होते, तेव्हा त्या पानांवरील दवबिंदू ‘अक्षरे’ बनून वहीच्या पानावर अलगद उतरतात, अशी सुंदर कल्पना कवी येथे करत आहे. वास्तव अतिशय तरल शब्दांत कवीने येथे मांडले आहे.

कवी – ‘जॉर्ज लोपीस’

कवितेचा विषय – झाडांमधील विविध गुण स्वत:मध्ये रुजवण्याचा संदेश

झाडाची पाने जेवढ्या मनमोकळेपणाने सळसळतात तेवढ्याच मनमोकळेपणाने आपणही हसावे, ज्याप्रमाणे मातीत घट्ट पाय रोवून झाड खंबीरपणे उभे असते, तेवढ्या खंबीरपणे आपण मुरावे.

i)  तनू, काया           ii) कापड
iii) हळुवार              iv) मधुर, गोड, सुरेल

‘हिरवंगार झाडासारखं’ या कवितेत साध्या-सोप्या शब्दांत कवीने झाडांच्या गुणांचे वर्णन केले आहे. झाड जणू काही एखादे व्यक्तिमत्त्व आहे, असे समजून कवी झाडांविषयी बोलत आहे. ही कवीची अनोखी कल्पना मला फार आवडली. ही कविता मुक्‍तछंदातील आहे. त्यामुळे, येथे यमक आढळत नाही; पण झाडांविषयीच्या उत्कट, तरल (सूक्ष्म) भावना कवी सहज व उत्स्फूर्तणणे व्यक्‍त करतो. पानझडीचा काळ संपल्यावर झाड हिरव्यागार, नव्याकोऱ्या पानांनी नव्या नवरीप्रमाणे सजून जाते ही कविकल्पना मला फार आवडली. झाडाचे अत्यंत लोभसवाणे व्यक्तिमत्त्व कवीने बारकाव्यांसह अत्यंत संवेदनशीलपणे टिपले आहे. या सर्व गोष्टींमुळे ही कविता मला फार आवडते.

‘हिरवंगार झाडासारखं या कवितेत झाडांच्या सहनशीलता, परोपकारी वृत्ती, दानीपणा, कठीण प्रसंगांतही घट्ट पाय रोवून उभे राहण्याचा खंबीरपणा अशा गुणांचे वर्णन केले आहे. आनंदी व समृद्ध जीवन जगण्यासाठी मानवानेही हे सगळे गुण आपल्या अंगी बाणवायला हवेत. तसेच, झाडांसारखे हिरवेगार, ताजे व प्रफुल्लित जीवन जगायला हवे असा संदेश कवीने या कवितेतून दिला आहे.

error: Content is protected !!