पाठ १५. खरा नागरीक (Marathi Question Bank Solution)

निरंजन हा भडसावळे गुरुजींचा लाडका विद्यार्थी होता, कारण – निरंजन अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा व अभ्यासही करायचा .

नागरिकशास्त्र

निरंजनचे आईवडील त्याच्या लहानपणीच वारले होते. ते गेल्यानंतर काही दिवस निरंजनच्या मामाने त्याला सांभाळले. काही काळाने त्याला कामासाठी म्हणून चिपळूणला आणले आणि मावशीकडे नेऊन सोडले. त्यानंतर मामा मुंबईला निघून गेला, तो कायमचाच. जाताना मात्र निरंजनला मोलाचा सल्ला देऊन गेला. मामा म्हणाला, ‘रडत बसू नको, शेण गोठा वगैरे जी पडतील ती सारी कामं कर. मावशी देईल ते खा आणि इथंच रहा. मावशी तुला शाळेतही घालणार आहे.’ असा सल्ला देऊन मामा निरंजनची जबाबदारी झटकून निघून गेला.

निरंजन वार लावून जेवायचा, कारण –  तो ज्या मावशीकडे राहत होता तिची परिस्थिती यथातथा होती .

 

निरंजन मनातल्या मनात उजळणी करत होता, कारण –  त्या दिवशी नागरिकशास्त्रासारखा निरंजनला अवघड वाटणारा पेपर होता .

 

परिस्थितीनुसार बदल हा निसर्गाचा नियम आहे. बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेतले तरच आपला टिकाव लागतो. हे जीवनातील सत्य येथेही लागू पडते. ज्यांना हक्काचे घर नसते अशा मुलांना इतरत्र कोठेही आपला निवारा शोधावा लागतो. हा निवारा कधीपर्यंत सोबत असेल याची खात्री नसते. त्यामुळे आहे ते टिकवून ठेवण्याकरता, परिस्थितीशी जुळवून घेत, प्रसंगी आपल्या आनंदाचा, इच्छा-आकांक्षांचा त्याग करून जीवन कंठावे लागते. हे जुळवून घेणे, शिकवावे लागत नाही, तर परिस्थितीनुसार ते आपसूकच घडून येते. त्यामुळे, हक्काचे घर नसलेली मुले इतरत्र राहताना परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकतात.

(१)  परीक्षा बुडून तो नापास होणार.
(२)  भडसावळे गुरुजींची मदत बंद होणार.
(३)  शिक्षणही बंद होणार.
(४)  रेल्वेने फिरायचं स्वप्न अपुरंच राहणार.

1)  मावशीचे घर गावाबाहेर होतं.  –  बरोबर              
2) निरंजन स्टेशनबाहेर पोहोचला तेव्हा दहा वाजले होते.  –  चूक

शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित राहिले, तर त्याला शिक्षण म्हणता येत नाही. जे शिकलो ते वर्तनात आणणे, तसे आचरण करणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षणातून विविध मूल्ये, संस्कार मनावर रुजवले जातात. त्यांचा प्रत्यक्षात उपयोग झाला नाही, तर मात्र त्याची किंमत शून्य होते. ‘प्राण्यांवर दया करा’ हा उपदेश शिक्षणातून दिला जातो; पण प्रत्यक्षात आपण मात्र प्राण्यांशी क्रूरपणे वागत असू, तर त्या शिक्षणाला शिक्षण म्हणताच येणार नाही. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे, तर शिक्षण म्हणजे या पुस्तकातील मूल्यांचा, ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात केलेला अवलंब होय.

नऊ पन्नासची गाडी स्टेशनवरून किती मिनिटांत सुटणार होती?

१)  नऊ पन्नासची गाडी नुकतीच आली होती.
२)  निरंजनने धावतच स्टेशन मास्तरांना गाठलं.
३)  पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं.
४)  निरंजनने आर्जवं केली.

समाजोपयोगी कामे करण्याला वयाचे बंधन नसते. अगदी अबालवृद्‌धांपर्यंत अनेक व्यक्‍ती समाजाच्या हिताचा विचार करून एखादे महान कार्य करून जातात. लहान मुले ही वयाने लहान असली तरीही शिक्षण व अनुभव यातून विचारांनी प्रगल्भ झालेली असू शकतात. त्यामुळे, शाळेत किंवा प्रत्यक्ष जीवनात मिळालेल्या धड्यांच्या साहाय्याने समाजहिताचा विचार करून समाजोपयोगी कार्य करू शकतात. हे कार्य त्यांना मोठे बनवण्यास पुरेसे असते.

निरंजनप्रमाणे नि:स्वार्थीपणे इतरांच्या हिताचे काम करताना अनेक वेळा आपल्याला स्वतःला नुकसान सहन करावे लागते; मात्र हे नुकसान बाजूला सारून त्या क्षणी इतरांच्या हिताच्या विचाराला प्राधान्य देण्यात खरी उदारता असते. बऱ्याच वेळा आपण आपला कार्यभार आटोपताना समोरची व्यक्‍ती संकटात सापडते. हे संकट मोठे आहे, त्याने त्या व्यक्तीचे प्रचंड नुकसान होऊ शकते याची जाणीव होणे व त्या जाणिवेतून त्या व्यक्तीला मदत करण्याची इच्छा होणे हे नि:स्वार्थीपणाचे लक्षण आहे. अशा नि:स्वार्थी भावाने केलेली मदत, सेवा हीच खरी ईश्वरसेवा असते. अशा वेळी आपल्या कामात आपले नुकसान होऊनही ते मान्य करून पुढे जाण्याची वृत्ती महत्त्वपूर्ण ठरते.

1)   समाजाविषयीचे कर्तव्य बजावणे
2)  इतरांना उपद्रव होणार नाही असे वागणे
3)  व्यक्तिगत स्वार्थापेक्षा समाजाच्या हिताला जास्त महत्त्व देणे
4)  आपले काम प्रामाणिकपणे करणे

निरंजन हा एक हुशार आणि जबाबदार मुलगा आहे. त्याच्या या गुणांचे दर्शन पाठात घडतेच; पण त्याच्यातल्या खऱ्या नागरिकाची ओळख होते ती रेल्वेच्या घटनेतून. पुलावरचे रूळ खराब झाल्याचे लक्षात येताच रेल्वे अपघाताचा भयंकर धोका त्याने ओळखला. खराब रुळांमुळे अपघात झाल्यास शेकडो लोकांचा जीव धोक्यात येईल हे त्याने ओळखले आणि स्वत:चा नागरिकशास्त्राचा पेपर बुडवूनही त्याने स्टेशनमास्तरांना खबर दिली. या कृतीमुळे आपला पेपर बुडेल, गुरुजींनी दिलेल्या सवलती जातील, हे माहीत असूनही, लोकांचा जीव वाचवण्याकरता स्वत:चे नुकसान सोसण्याची तयारी त्याने दाखवली. त्यामुळे, एक मोठा अनर्थ टळला. नागरिकशास्त्र हा विषय आपल्याला जे शिकवतो ते त्याने प्रत्यक्षात आयुष्यात करून दाखवले. त्यामुळे, ‘निरंजन एक खरा नागरिक’ असल्याचे स्पष्ट होते.

error: Content is protected !!