पाठ ३. शाल (Marathi Question Bank Solution)

म्हातारा भिक्षेकरी ओंकारेश्वर मंदिराच्या पुलाच्या जवळपास मध्यावर बसला होता.

भिक्षेकऱ्याने अंगावर व अंगाखाली चिरगुटे पांघरली होती.

माझ्या मते भिक्षेकऱ्याने शालीचा केलेला उपयोग त्याच्या परिस्थितीला अनुरूप होता. अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे. ही गरजे भागवण्याकरता भिक्षेकऱ्याने शाली विकण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता. शरीराचे थंडीपासून रक्षण करण्याकरता लेखकाने दिलेल्या शाली भिक्षेकऱ्याला उपयुक्‍त ठरणार होत्या; मात्र शरीराच्या उबेची गरज ही त्याच्याकरता दुय्यम होती. पोटात भुकेचा डोंब उसळलेल्या त्या भिक्षेकऱ्याला पोटभर अन्नाची अधिक गरज वाटली. त्यामुळे, मागचा पुढचा विचार न करता त्याने त्या शाली विकल्या. त्यातून मिळालेल्या पैशांतून त्याने आपली प्राथमिक गरज भागवली. त्याला जाणवणारी भूक हो त्याला बोचणाऱ्या थंडीपेक्षा अधिक तीव्र होती. त्यामुळे, त्याने घेतलेला हा निर्णय योग्यच होता असे मला वाटते.

शाल हे सामान्यपणे सन्मानाचे प्रतीक मानले जाते. एखाद्या व्यक्तीने केलेल्या उत्तुंग कार्याबद्दल त्याचा गौरव करण्याकरता शाल भेट रूपाने दिली जाते. मानाच्या रूपात मिळणारी ही शाल मात्र काही वेळा मानवी स्वभावास गर्वाचा स्पर्श करवते. मिळणार्‍या मान-सन्मानाने हुरळून जाऊन शालींनी नावाजलेली व्यक्‍ती आपल्या अंगी असणारी विनम्रता, शालीनता यांचा त्याग करते आणि गर्वाने फुगते. त्यामुळे, शालींमुळे शालीनता जाते हे एका अर्थी सत्य ठरते; मात्र प्रत्येक व्यक्तिबाबत असेच घडते असे नाही. अनेक मोठे मान-सन्मान मिळवणारे दिग्गज आजही आपली शालीनता सांभाळून असल्याची काही उदाहरणे आजही आहेत; पण हे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. ‘शालीमुळे शालीनता जाते’ या वाक्यात दडलेला सखोल अर्थ उलगडत लेखकाने अचूकपणे मानवी स्वभावदोषावर बोट ठेवलेले दिसून येते.

error: Content is protected !!