पाठ ४. उपास (Marathi Question Bank Solution)

(१) लेखक पूर्वीसारखे गाढ झोपत नाही यावर विश्‍वास न ठेवणारी – लेखकाची धर्मपत्नी
(२) लेखकाला डायटचा सल्ला देणारा – सोकाजी त्रिलोकेकर

मी पाचवीत होतो त्या वर्षी राज्यात दुष्काळाची परिस्थिती येऊ घातली होती. त्यावेळी ठरवले, की मी एकतरी रोपटे लावेन आणि त्याची योग्य प्रकारे काळजी घेईन. त्या वर्षी वाढदिवसाचा खर्च मी टाळला. त्यातून बाबांच्या मदतीने रोप आणून ते लावले, हा साऱ्या कुटुंबियांसाठी एक आनंदाचा क्षण होता. त्या रोपाला रोज पाणी घालणे, माती ठीक करणे यात एक वेगळेच समाधान मिळू लागले. आपण लावलेल्या त्या रोपट्याचे वर्षभरातच बहरलेले ते रूप पाहून मला खूप आनंद झाला. दर वाढदिवशी असेच एक झाड लावून त्याची निगा राखण्याची भीष्मप्रतिज्ञा मी केली. याचा परिणाम म्हणून आज मी लावलेली पाच झाडे माझ्या अंगणात डौलाने उभी आहेत. त्यांची टण्याटण्याने होणारी वाढ पाहून मन रोज आनंदाने फुलून येते.

लेखकाला तेल व तळलेले पदार्थ सोडायला सांगणारे – बाबू काका

वजन घटवण्याकरता पहिला उपाय म्हणून लेखकाने काय केले ?

हो. मी लेखकाच्या या मताशी सहमत आहे. लेखकाने डाएट सुरू करायचा निर्धार व्यक्त करताच चाळीतल्या लोकांनी त्यांनी काय खाऊ नये याची ढीगभर मोठी यादीच समोर मांडली. व्यक्‍ती तितक्या प्रवृत्तीप्रमाणे प्रत्येक शेजाऱ्याने एक वेगळा पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे, नक्की जगण्यासाठी काय खावे असा प्रश्‍न उपस्थित होणे साहजिकच होते. प्रत्येकाची मते शांतपणे ऐकून घेऊन लेखकाने मात्र स्वत:च स्वत:चे आहारव्रत सुरू करण्याचा निर्णय घेतला. एक ना धड भाराभर चिंध्या होण्यापेक्षा स्वत: विचार करून, वाचन करून, माहिती मिळवून योग्य प्रकारे आहारव्रत पार पाडण्याचा लेखकांचा हेतू येथे स्पष्ट होतो. त्यामुळे, हवी तशी मतं मांडणाऱ्या शेजाऱ्यांच्या विचारांना न जुमानता स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचा लेखकाचा निर्धार मला पटतो.

उपास हे आचार्य बर्व्यांचे खास कुरण होते.

लेखकाच्या वजनक्षय संकल्पाला लेखकाच्या पत्नीने सुरुंग लावला.

परिणाम : लेखकाचा दिवाणखाना लहान असल्याने तेथे ड्रेसिंग टेबलवरील बाटल्या खाली पडल्या, तर दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी व अर्धवट घरात राहून दोरीउडी मारली असता दोरी आचार्य बर्वेंच्या गळ्यात पडली.

बाबा बर्व्यांचा लेखकावर आधीपासूनच राग होता.   सत्य

हो. मी लेखकाच्या या मताशी सहमत आहे. लेखकाने डाएट सुरू करायचा निर्धार व्यक्त करताच चाळीतल्या लोकांनी त्यांनी काय खाऊ नये याची ढीगभर मोठी यादीच समोर मांडली. व्यक्‍ती तितक्या प्रवृत्तीप्रमाणे प्रत्येक शेजाऱ्याने एक वेगळा पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे, नक्की जगण्यासाठी काय खावे असा प्रश्‍न उपस्थित होणे साहजिकच होते. प्रत्येकाची मते शांतपणे ऐकून घेऊन लेखकाने मात्र स्वत:च स्वत:चे आहारव्रत सुरू करण्याचा निर्णय घेतला. एक ना धड भाराभर चिंध्या होण्यापेक्षा स्वत: विचार करून, वाचन करून, माहिती मिळवून योग्य प्रकारे आहारव्रत पार पाडण्याचा लेखकांचा हेतू येथे स्पष्ट होतो. त्यामुळे, हवी तशी मतं मांडणाऱ्या शेजाऱ्यांच्या विचारांना न जुमानता स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचा लेखकाचा निर्धार मला पटतो.

लेखकाचे वजन कमी करण्याचे दोन खात्रीशीर उपाय – १) असामान्य मनोनिग्रह  २) जिव्हानियंत्रण

अ) जवळजवळ दहाबारा दिवस हा क्रम चालू होता.
आ) दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती.

१) साखर घालून केलेला भात – साखरभात
२) पंधरा दिवसांचा समूह – पंधरवडा

लेखकाच्या मते त्याने असमान्य मनोनिग्रह व जिव्हानियंत्रण राखून आपले आहारव्रत प्रामाणिकपणे पार पाडले होते. प्रत्यक्ष पाहता पंधरवडाभरात आहारव्रत चुकवत दोन वेळा साखरभात, एकदा कोळंबीभात आणि एकदा नागपुरी वडाभात तेवढा खाल्ला होता. या आहारव्रतानंतर लेखकाचे वजन किमान वीस-पंचवीस पौडांनी घटण्याची लेखकाला अपेक्षा होती; मात्र महिन्याभरापूर्वी एकशे एक्याऐंशी पौंड असलेले वजन आहारव्रतानंतर मात्र एकशे ब्याण्णव पौंड एवढे झाले होते. यावरून लेखकाच्या आहारव्रताची आपणांस कल्पना येते.

error: Content is protected !!