‘दोन दिवस’ ही कवी नारायण सुर्वे यांची कविता कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करते.
कष्टकऱ्याचे संपूर्ण आयुष्य अखंड परिश्रम करण्यात निघून जाते. आयुष्यात काही दिवस सुखाची वाट पाहत जगावे लागते, तर काही दिवस दु:ख, दारिद्र्याशी झुंजावे लागते. आजवरचे सगळे आयुष्य जरी असेच दिवसादिवसांनी सरत गेले, तरीही त्यापुढील आयुष्यात असे किती तापदायक उन्हाळे सहन करावे लागणार आहेत याची गणती नसते. असे तापदायक आयुष्य जगणाऱ्या कष्टकरी कामगाराच्या जीवनाचे दर्शन यात घडते.