(अ) आस लागणे म्हणजे ……….. (१) ध्यास लागणे (२) उत्कंठा वाढणे (३) घाई होणे (४) तहान लागणे.
उत्तर : ध्यास लागणे
(आ) वाटुली म्हणजे ……….. (१) धाटुली (२) वाट (३) वळण (४) वाट पाहणे.
उत्तर : वाट
प्र. ३ भावार्थाधारित :
(अ) संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.
उत्तर : संत तुकारामांनी या अभंगात दिलेले लहान बाळाचे उदाहरण मला खूप आवडते. ज्याप्रमाणे लहान बाळाचे विश्व हे त्याची आईच असते त्याचप्रमाणे तुकारामांचे विश्व म्हणजे फक्त विठ्ठलच आहे. बाळाला भूक लागल्यावर तो अतिशय आतुरतेने आपल्या आईची वाट पाहतो. तिची भेट होणे हे त्याचे ध्येय असते. त्याचप्रमाणे विठ्ठलाची भेट हे संत तुकारामांच्या जीवनाचे ध्येय आहे.
(आ) चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : संत तुकारामांना विठ्ठल भेटीची आस लागली आहे. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते. पौर्णिमेच्या चंद्राची तो आतुरतेने वाट पाहत असतो. त्याचप्रमाणे पंढरपुरच्या विठ्ठलाच्या भेटीची संत तुकारामांना आस लागली आहे. विठ्ठलाचे दर्शन हेच जणू त्याच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे.
(इ) ‘तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र/मैत्रिणीच्या भेटीला आसुसले आहात’ हे सांगण्यासाठी एखादा दृष्टान्त वापरा व तो स्पष्ट करा.
उत्तर : “दिवाळीच्या मुळा लेकी आसावली पाहातसे वाटुली पंढरीची” जवळच्या मित्राच्या भेटीला आसुसले आहोत यासाठी मला वरील दृष्टान्त अतिशय योग्य वाटतो कारण दिवाळीच्या सणात ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली माहेरच्या लोकांना भेटण्यासाठी व्याकुळ असते. त्याचप्रमाणे मी देखील माझ्या गावाहुन आलेल्या मित्राच्या भेटीसाठी आसुसलेलो आहे.