भाग ३ पाठ – व्हेनिस (स्थूलवाचन)

प्र.१. टिपा लिहा.

(१) ग्रँड कॅनॉल

उत्तर:
       व्हेनिस स्टेशनच्या बाहेर एक प्रचंड कालवा, एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा. हाच तो ग्रँड कॅनॉल. त्यात अनेक पॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लाँचीस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या असतात. त्या विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने जा-ये करत असतात. हायवेवर वाहनांची वाहतूक चालावी तशी त्या जलमार्गावर नावांची धावपळ चालली असते. या ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावर चार खुर्च्यांच्या मध्ये टेबल आणि त्यावर रंगीबेरंगी प्रचंड छत्री ठेवलेली आढळते. या खुर्च्यांवर बसून कॉफी पीत पाण्यातून प्रवास करणाऱ्या नावांकडे पाहणे सगळ्यांना मनापासून आवडते.

(२) व्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसर

उत्तर:
     व्हेनिस हे गाडीचे अखेरचे स्टेशन आहे. त्या स्टेशनच्या बाहेर रस्ता नाहीच. एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा पसरलेला एक प्रचंड कालवा आहे. त्यालाच ‘ग्रँड कॅनॉल’ म्हणतात. त्यात अनेक पॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लाँचीस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या असतात. ‘व्हेनिझिया-व्हेनिझिया, पियाझा-पियाझा’ असा पुकार चालला असतो. लेखक टॅक्सीपेक्षा अडीचशे लिरांचे बोटीचे तिकीट काढले. दोनएकशे प्रवासी पोटात घेऊन लेखकाची नाव जोरात निघाली होती.

प्र. २. खालील मुद्द्यांच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा.

(अ) व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन

उत्तर: 
      व्हेनिस म्हणजे कालव्यात तरंगणारे शहर आहे. व्हेनिस पाण्यातले असे जगातले एकमेव अद्‌भुत शहर आहे. या शहरात एकही मोटार नाही कारण याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत. आहेत ते कालवे-फक्‍त कालवे आणि त्यांना जोडणारे पूल. व्हेनिसचे रस्ते म्हणजे पाणरस्ते असतात. व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर आहे. म्हणून व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन असे म्हटले जाते.

(आ) व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर.

उत्तर:  
         व्हेनिस पाण्यातले असे जगातले एकमेव अद्‌भुत शहर आहे. व्हेनिस म्हणजे खऱ्या अर्थाने अफाट जलदर्शन आहे. अशा या व्हेनिसच्या हवेत गारवा असतो. इथल्या वाऱ्यात उत्साही आणि मनात संगीत नाचत असते. तसेच सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य असते. त्यामुळेच व्हेनिस शहराचे वर्णन करताच येत नाही. म्हणून व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर आहे.

प्र. ३. खालील संकल्पना स्पष्ट करा.

(अ) व्हेनिस म्हणजे हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका

उत्तर:
       व्हेनिस पाण्यावर तरंगणारे हे जगातले एकमेव अद्भूत शहर आहे. इथे अनेक कालवे आणि त्यांना जोडणारे पूल दिसते. आईच्या गळ्यात मुलाने हात टाकावा तसे हे पूल. लाडिक, प्रेमळ. हा गाव म्हणजे रूढ अर्थाने शहर नव्हेच, तर अनेक छोट्या बेटांचा हा पुंजकाच आहे. निळ्या मखमली सागरावर टाकवेल्या हिऱ्या-माणकांच्या ढिंगासारखा हा लांबून दिसतो.  म्हणूनच व्हेनिस म्हणजे हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका आहे.

(आ) व्हेनिस म्हणजे निरुद्योगी शहर.

उत्तर:
       व्हेनिस पाण्यावर तरंगणारे हे जगातले एकमेव अद्भूत शहर आहे. इथे अनेक कालवे आणि त्यांना जोडणारे पूल दिसते. आईच्या गळ्यात मुलाने हात टाकावा तसे हे पूल. लाडिक, प्रेमळ. हा गाव म्हणजे रूढ अर्थाने शहर नव्हेच, तर अनेक छोट्या बेटांचा हा पुंजकाच आहे. निळ्या मखमली सागरावर टाकवेल्या हिऱ्या-माणकांच्या ढिंगासारखा हा लांबून दिसतो.  म्हणूनच व्हेनिस म्हणजे हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका आहे.

प्र. ४. ‘व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे’, पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या.

‘मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद’ या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा.

उत्तर:
       व्हेनिस म्हणजे रूढ अर्थाने शहर नव्हेच, तर अनेक छोट्या बेटांचा हा पुंजकाच आहे. या शहरात एकही मोटार नाही कारण याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत. आहेत ते कालवे-फक्‍त कालवे आणि त्यांना जोडणारे पूल. व्हेनिसमध्ये ग्रँड कॅनॉल नावाचा एक प्रचंड कालवा, एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा आहे. त्यात अनेक पॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लाँचीस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या असतात. व्हेनिसचे रस्ते म्हणजे पाणरस्ते असतात. व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर आहे. म्हणून व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे असे म्हटले जाते.

प्र. ५. तुम्ही पाहिलेल्या तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.

उत्तर:
       भारतात बरीच सुंदर आणि पाहण्यासारखी ऐतिहासिक स्थळे आहेत. परंतु आग्राचा ताजमहाल सर्वांत सुंदर आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आणि माझा मित्र त्यास भेटलो होतो. या दृष्टान्ताने माझ्यावर एक जादू केली. खरंच किती सुंदर आहे! जागेवर असेच कोणी म्हणू शकते. चार इमारत मुख्य इमारतीत पहारेकरी म्हणून उभे राहिले.दुसर्‍या दिवशी पूर्ण चंद्रप्रकाश पडला. त्या रात्री आम्ही पुन्हा ताजला भेट दिली. चंद्राच्या चांदीच्या प्रकाशात त्याचे सौंदर्य हसत होते. तो एक संस्मरणीय चित्र होता.ताजमहाल जवळपास साडेतीनशे वर्षांपूर्वी मोगल सम्राट शाहजहांने त्याची प्रिय राणी मुमताजच्या स्मरणार्थ बांधला होता.

error: Content is protected !!