भाग १ पाठ – २ संतवाणी – (आ) संतकृपा झाली

प्र.  १.  चौकटी पूर्ण करा :

उत्तर:

प्र. २. कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.

उत्तर :

प्र. ३. भावार्थाधारित.

(१) ‘तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.

उत्तर : 
        संतांची कृपा झाली व त्यांच्यामुळे वारकरी संप्रदायाच्या मंदिराची इमारत पूर्ण झाली  या वारकरी संप्रदायरूपी इमारतीवर संत तुकारामांनी आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायरूपी इमारतीला परिपूर्णता प्राप्त करून दिली. तसेच पूजाअर्चा, कर्मकांड यांमध्ये न पडता नामस्मरण (भजन) हा भक्तीचा सोपा मार्ग तुकाराम महाराजांनी सर्वांना सांगितला.

(२) ‘ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया ।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.

उत्तर : 
       वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्‍वरांनी रचिला. आपल्या ज्ञान व भक्‍ती यांच्या जोरावर ‘ज्ञानेश्‍वरी’ या इमारतीचा पाया निर्माण केला. वारकरी संप्रदायाची स्थापना केली.

प्र. ४. अभिव्यक्ति.

(१) संतांचे कार्य नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर :  
        संतांचे मुख्य लक्ष्य हे पारलौकिक हित हेच होते. आणि याच लक्ष्याचा त्यांनी समाजात प्रचार केला. ऐहिक सुख हे त्यांचे मुख्य लक्ष्य कधीच नव्हते. संतांनी नेहमीच दया, क्षमा, शांती यांची शिकवण समाजाला दिली. मुक्या प्राणीमात्रांवर प्रेम करा असा मोलाचा संदेश संतांनी समाजाला दिला. संत एकनाथांनी चंद्रभागेच्या त्या कडक उन्हाच्या वाळवंटात तहानेने तडफडत असलेल्या गाढवाला पाणी पाजले.

error: Content is protected !!