प्र. १. रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
(१) भारतात सर्वात पहिली रेल्वे ……….. येथून सुटली.
(१) ठाणे (२) मुंबई (३) कर्जत (४) पुणे
उत्तर:मुंबई
(२) रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ……….. ठेवले.
(१) तिकीट (२) बक्षीस (३) इनाम (४) प्रलोभन
उत्तर:इनाम
प्र. २. आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
प्र. ३. आकृती पूर्ण करा.
उत्तर:
प्र. ४. खालील शब्दांसाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
उत्तर:
प्र. ५. कारणे लिहा.
(अ) रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.
उत्तर: रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला कारण लोकांत भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते. वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती भुताटकी आहे, मुंबईला नव्या इमारती नि पूल बांधताहेत, त्यांच्या पायांत जिवंत गाडायला फूस लावून माणसे नेण्याचा हा साळसूद डाव आहे अशी लोकांची समजूत होती.
(आ) इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
उत्तर: इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली कारण लोकांचा धीर चेपलासे पाहून, इनामे बंद झाली.
प्र. ६. स्वमत.
(अ) ‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.
उत्तर: रेल्वेचा शोध झाल्यामुळे आज भारतात एका वेळी एक गाडीतून हजारो माणसे प्रवास करतात. भारतात पसरलेले रेल्वेचे जाळे पाहता, एका दिवशी करोडोंनी माणसे प्रवास करू शकतात. त्यामुळे करोडो रुपयांची भारतात उलाढाल दररोज होते. म्हणून ‘ रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’.
(आ) स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद॒धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर: स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात शिक्षणाचा प्रसार व लोकांत वैज्ञानिक दृष्टिकोण नव्हते. लोकांवर अंधश्रद॒धांचा फार मोठा पगडा होता. त्यामुळे कोणताही आधुनिक बदल सहजासहजी स्वीकारला जात नव्हता. पांरपरिक गोष्टींवर लोकांचा जास्त विश्वास होता. म्हणुनच इंग्रजांनी सुरू केलेली वाफेची गाडी म्हणजे विलायती भुताटकी आहे, मुंबईला नव्या इमारती नि पूल बांधताहेत, त्यांच्या पायांत जिवंत गाडायला फूस लावून माणसे नेण्याचा हा साळसूद डाव आहे अशी लोकांची समजूत होती.
(इ) तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
उत्तर: रेल्वेप्रवासाच्या फायद्यांचा विचार केला असता सर्वांत स्वस्त असा प्रवासाचा मार्ग म्हणून हा ओळखला जातो. प्रवासाच्या दृष्टीने अतिशय वेगवान असा हा वाहतुकीचा मार्ग आहे. रेल्वेच्या माध्यमातून केवळ प्रवाशांचीच नव्हे, तर उद्योगधंद्यातील मालाची वाहतूक करणेही सोपे होते. वरील फायद्यांबरोबरच रेल्वे प्रवासाचे काही तोटेही आहेत. रेल्वेमार्गाचे जाळे निर्माण करणे अत्यंत बिकट व अत्यंत खर्चिक काम आहे. रेल्वे गाड्यांचे अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी होते. अशाप्रकारे रेल्वे प्रवासाचे काही फायदे व काही तोटे आहेत.