भाग २ पाठ – ५. व्यायामाचे महत्त्व

प्र. १. व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.

उत्तर:

प्र. २. चूक की बरोबर ते लिहा.

(अ) व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.
उत्तर:  बरोबर

(आ) व्यायामाने जडत्व वाढते.
उत्तर:  चूक

(इ) व्यायामाने स्नायू अशक्त होतात.
उत्तर: चूक

(ई) व्यायामाने प्रतिकारशक्‍ती वाढते.
उत्तर:  बरोबर

प्र. ३. शब्दसमूहांबद्दल्ल एक शब्द चौकटींत लिहा.

(अ) आरोग्य देणारी –
(आ) विरोध करण्याची क्षमता असलेली शक्‍ती –
(इ) स्वतःची कामे स्वतः करणारा –
(ई) एका अंगाने केलेला विचार –

उत्तर:
(अ) आरोग्य देणारी – आरोग्यदायी
(आ) विरोध करण्याची क्षमता असलेली शक्‍ती – प्रतिकारशक्ती
(इ) स्वतःची कामे स्वतः करणारा – स्वावलंबी
(ई) एका अंगाने केलेला विचार – एकांगी

प्र. ४. व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.

उत्तर:

प्र. ५. भावार्थाधारित.

(अ) व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: शरीराला स्थिरता प्राप्त करण्यासाठी, शरीर मजबुत बनवण्यासाठी, बल वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या क्रियेस व्यायाम असे म्हणतात. व्यायामामुळे शरीर निरोगी बनते. शरीर मजबूत होते, बलाची वाढ होते. पर्यायाने रोग प्रतिकारक शक्‍तीमध्ये वाढ होते. व्यायामामुळे आळस नाहीसा होतो. कार्य करण्याची स्फुर्ती मिळते, आत्मविश्वास वाढतो. म्हणून व्यायाम करणे हे महत्त्वाचे आहे.

(आ) ‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची ।।’  या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

उत्तर:
श्री तुकडोजी महाराज म्हणतात की, व्यायामामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढते. नियमित व्यायामामुळे शरीरातील आळस, कंटाळा दूर होते. कामामध्ये उत्साह जाणवतो. म्हणजेच कोणतेही काम करण्याची शरीरातील स्फूर्ति वाढते.

(इ) ‘आरोग्यम्‌ धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.

उत्तर:
‘आरोग्यम् धनसंपदा’, ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ हे नेहमीच ऐकायला मिळणारे खरे असलेले बोधवाक्य आहे. आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मोठी पुंजी असते. सोने, चांदी, संपत्ती म्हणजे श्रीमंती नव्हे! शरीर निरामय असेल, सर्व कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये कार्यक्षम असतील आणि त्याचबरोबर मन आणि बुद्धी यांचे संतुलन असेल. तरच खरा सुखोपभोग घेता येईल. हेच खरे धनसंपत्ति असते.

error: Content is protected !!