भाग २ पाठ – ७. दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्र. १. (अ) आकृती पूर्ण करा.

उत्तर: (अ)


(आ) रिकाम्या जागा भरा.

(१) ………………… या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.

(२) ………………… माध्यमातून दिव्याच्या शोधाची बातमी सर्वत्र पसरली.

(३) एडिसनच्या मते त्याच्यात ………….% चिकाटी होती.

उत्तर:
(१) २१ ऑक्टोबर, १८७९
(२) वर्तमानपत्राच्या
(३) नव्याण्णव

प्र. २. (अ) योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.

(१) प्लेटिनमचा प्रयोग………….. होता.
  (स्वस्त, फायदेशीर, महागडा, व्यवहार्य)

(२) फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे ………. वाचतात.
  (पैसे, श्रम, कागद, प्रयत्न)

उत्तर:
(१) महागडा
(२) श्रम

(आ) आकृती पूर्ण करा.

उत्तर:

        

प्र. ३. खालील वाक्‍यांतील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.

(१) घराभोवती दिव्यांचा झगमगाट पाहायला सारे गाव लोटले.

उत्तर: घराभोवती दिव्याचा झगमगाट पाहायला सारे गाव लोटले.

(२) कार्बनचा तुकडा जोडून प्रकाश तयार करण्याचे काम खर्चिक होते.

उत्तर: कार्बनचे तुकडे जोडून प्रकाश तयार करण्याचे काम खर्चिक होते.

(३) अमेरिकेच्या पोस्टखात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकिटेही प्रसिद्ध केली.

उत्तर: अमेरिकेच्या पोस्टखात्याने दिव्याचे चित्र असणारे तिकीटही प्रसिद्ध केले.

(४) फसलेल्या प्रयोगांची पद्धतशीर नोंद एडिसनने वहीमध्ये ठेवली.

उत्तर: फसलेल्या प्रयोगांची पद्धतशीर नोंद एडिसनने वह्यांमध्ये ठेवली.

प्र.४. स्वमत.

(१) संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.

उत्तर: संशोधक होण्यासाठी, यशात एक हिस्सा भाग बुद्धिमत्तेच्या असल्यास ९९ भागा चिकाटीच्या असते हे मी ध्यानात ठेवीन. प्रत्येक गोष्टीचे बारीक निरीक्षण करून ती समजून घेण्याचा मी प्रयत्न करेन. संकटांना तोंड देण्याची, असंख्य प्रकारचे प्रयोग करून पाहण्याची व हजारो वेळा अपयश आले तरी पुन्हा तितक्‍याच उमेदीने नवे प्रयोग करून पाहण्याची चिकाटी माझ्याजवळ ठेवीन. प्रयोग चालू असताना मीसुद्धा चहा, जेवण आणि झोप हे सारे प्रयोगशाळेतील टेबलावरच घेईन. भूक लागली, की उभ्या उभ्याच थोडेसे खायचे, थकल्यासारखे वाटले, की बसल्या बसल्या थोडीशी डुलकी घ्यायची अशी वृत्ती अंगी जोपासणार.

(२) विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.

उत्तर: विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी मी सहमत आहे कारण जर न्यूटनचा गुरुत्वाकर्षणावरील संशोधन विचारात ठेवले तर ते फार मोठे संशोधन नाही, एवढेच आहे की सफरचंद झाडावरुन खाली का पडला, वरच्या बाजूस का गेला नाही, परंतु त्यानंतर न्यूटनने त्यामागील कारण शोधण्यासाठी जे कठोर परिश्रम केले हे महत्त्वाचे होते. शोध लावण्यासाठी निरीक्षण, अनुमान, प्रयोग आणि पुन्हा पुन्हा प्रयोग करावे लागतात.

(३) तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते  प्रयत्न कराल?

उत्तर: माझ्या मनात कोणतीही नवीन कल्पना येत असल्यास, ती प्रत्यक्षात आणण्यापूर्वी मी याबद्दल शास्त्रज्ञांशी चर्चा करेल. या नवीन कल्पनेने समाजाला होणारे फायदे आणि त्याचे किती नुकसान आहे याबद्दल मी माहिती घेईन. जर अधिक फायदा होईल, तर मी नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करेन. मी अपयशी ठरलो तरीही यशासाठी धडपडत राहणार.

अपठित गद्य आकलन 

खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृति करा .

प्र. १  खालील आकृतिबंध पूर्ण  करा .

उत्तर: 

प्र. २  ‘ चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्व घडते हे ‘ हे उदाहरणासह  स्पष्ट करा .

उत्तर: आपले पालक, शिक्षक आणि चांगले लोक आपल्याला चांगल्या सवयी शिकवतात. परंतु जर आपण आयुष्यभर या चांगल्या सवयींचा अवलंब केला तर आपले व्यक्तिमत्व सुधारली जाते. उदाहरणार्थ, आपले आईवडील आपल्याला खोटे बोलण्यास, चोरण्यास नकार देतात, या गोष्टींचा नेहमी त्याग करा असे सांगतात आणि जर आपण अशाच सवयी स्वीकारला, तर आपण मोठे झाल्यावरही या वाईट गोष्टींपासून दूर राहतो आणि आपल्याला या चांगल्या सवयीमुळे समाजात चांगला आदर मिळतो.

उत्तर:    (१) यथाविधी  (२) गल्लोगल्ली   (३) बेशिस्त        (४) बिनधोक        (५) दारोदारी

error: Content is protected !!