प्र. १. खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.
उत्तर:
प्र. २. ‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
उत्तर:
(१) ‘हाडं गेली वड्याला, बघा माज्या मड्याला.’
(२) ‘मरण लोकाला, सरण दिक्काला/माजं कपाळ, भरलं आभाळ/ मरलं माणूस, झिजलं कानुस/म्हातारी नवसाची,भरून उरायची.’
(३) ‘गाव गरतीला, सपान धरतीला/धरती दुवापली, माती हाराकली.’
प्र. ३. गुणवैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:
प्र. ४. कंसातील सूचनेनुसार बदल करा.
उत्तर:
(अ) याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. (काळ ओळखा)
उत्तर: वर्तमानकाळ
(आ) आजी, कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा)
उत्तर: आजी – सामान्यनाम
(इ) आजी माझ्या जवळची होती. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा)
उत्तर: आजी माझी दूरची होती.
(ई) डोंगराच्या कुशीत वसले होते ते गाव! (अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा)
उत्तर: पर्वताच्या कुशीत वसले होते ते गाव!
प्र.५.स्वमत.
(अ) सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा.
उत्तर: सखू आजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची.म्हणजे कुणी म्हटलं, ‘म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मरायला.’ तर ती लगेच म्हणायची, ‘मरण लोकाला, सरण दिक्काला/माजं कपाळ, भरलं आभाळ/मरलं माणूस, झिजल कानुस/म्हातारी नवसाची, भरून उरायची.’ सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी मला भावलेल्या हा पहिला विशेष कारण तिच्याशी बोलताना लोकांना एक अवर्णनीय आनंद मिळायचा.
सखू आजी गावातल्या कुणाच्याही बारशाला, लग्नाला, मयताला हटकून पुढं असायचीच. सगळं तिच्या म्हणण्यानुसार चालायचं. तिच्या शब्दाला चॅलेंज नसायचं. सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी मला भावलेल्या हा दुसरा विशेष कारण या प्रसंगातून मला आजीच्या प्रेमळ व्यक्तिमत्त्वाचे दर्शन मिळते.
(आ) खालील अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
(१) करारीपणा (२) आजीचा गोतावळा
उत्तर: करारीपणा:
आजीची न्यायदृष्टी निर्मळ होती. तिची गावाला भीती होती. आजीला गावाला खूप मान होता. आजीच्या करारीपणाचे व्यक्तिमत्त्व मला पुढील प्रसंगातून दिसून येते. एकदा गावनियमाविरुद्ध वागणाऱ्या सातबा घोरपड्याच्या मुलाला पंचांनी व गावकऱ्यांनी दंड करावा असे ठरवले. त्यावेळी सखू आजी आपल्या करारी स्वभावानुसार ठामपणे म्हणाली की, ‘पोरगं मांडीवर घाण करतंय म्हणून मांडी कापता व्हयगाऽऽ?’ सगळे टाळा पगळून बघाय लागले. बोलायचं काय? शेवटी सगळे उठले. आपापल्या घराच्या वाटेला लागले. त्यामुळेच सातबाच्या मुलाला कोणीही काहीही बोलले नाही.
आजीचा गोतावळा :
सारा गाव हा सखू आजीचा गोतावळा होता. सखू आजीला गावातल्या सगळ्या लहान-थोरांमध्ये आपलं घर दिसायचं. सगळे गावकरी जणू तिचे नातेवाईकच होते. आजीने सगळ्या अडाणी आया-बायांना साक्षर केले. गावातला चोपडा यांचा मुलगा पहिल्यांदा पोलिस झाला. त्यावेळी आजीने गावच्या बाया गोळा करुन त्याला ड्रेसवरच ओवाळलं. दही-साखरेनं तोंड गोड केलं अशा या सखू आजीचा गाव म्हणजे गोतावळाच होता.
प्र. ६. अभिव्यक्ती.
(अ) ‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
उत्तर: पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे गावांमध्ये आजी नावाच्या व्यक्तिमत्त्वाला फार महत्त्व असे. पण हल्ली परिस्थिती बदलली आहे. आजकालच्या विभक्त कुटुंबपद्धती झाल्यामुळे आजी सारख्या म्हाताऱ्या माणसांना जागाच उरली नाही. आजकाल लोक आजीच्या मतांना विनाकारण केलेला हस्तक्षेप समजतात. म्हणून आजीच्या मताला किंमतच उरली नाही. आज आजीसारख्या वडीलधाऱ्या माणसांची जागा फक्त वृद्धाश्रमात उरली आहे. पूर्वी आजीकडून एखादी गोष्ट ऐकल्याशिवाय न झोपणारी नातवंडे आज मोबाईलशिवाय झोपत नाही. म्हणून आता गावगाडा बदललामुळे आजीला जागाच उरली नाही, हे खरे आहे.
(आ) तुम्हांला समजलेल्या ‘सखू आजीचे’ व्यक्तिचित्र रेखाटा.
उत्तर: आजीचे वय नव्वद वर्षे होते. हातात नेहमी काठी असायची. ती नेहमी कवितेतूनच बोलायची. तिच्याशी बोलताना प्रत्येकाला आनंद व्हायचा. लहान मुलांना जमवून त्यांना चित्रविचित्र गोष्टी सांगणे तिला खूप आवडायचे. फक्त पंधरा दिवसात शिकून आजी दुसऱ्यांना पण शिकवू लागली. गावातला एक मुलगा पहिल्यांदा पोलिस झाला, तेव्हा गावातल्या बायका गोळा करून तिने ड्रेसवरच त्याला ओवाळले. सगळ्यांना तिच्याविषयी मनात आदर होता. म्हणून जेव्हा सखू आजी मरण पावली तेव्हा लहान पोरांपासून म्हाताऱ्याकोताऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले होते.
(इ) सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा.
उत्तर:
सखू आजी व माझी आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळे :
(१) सखू आजी प्रमाणे माझी आजी सुद्धा वृद्ध आहेत.
(२) माझी आजीच्या स्वभाव सुद्धा करारी आहे.
(३) सखू आजी प्रमाणे माझी आजी सुद्धा खूप प्रेमळ आहे.
(४) माझी आजीसुद्धा साऱ्या गावाची आजी आहे.
(५) माझी आजीचा शब्द कोणी मोडत नही.