‘ब’ गट (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे (इ) मातीने भेदभाव विसरावा (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी
उत्तर: ‘अ’ गट (१) बीज रक्तात भिनावी (२) मातीत माती एक व्हावी (३) नवनिर्माणाची चाहूल लागावी (४) पुसून टाकीत भेदभाव (५) उजळावी भूमी दिगंतात ‘ब’ गट (अ) माणसांत उत्साह निर्माण व्हावा (आ) मातीने भेदभाव विसरावा (इ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी (ई) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे (उ) सर्वत्र भारत भूमी चमकावी
प्र. ४. भावार्थाधारित.
‘मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद’ या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा.
उत्तर: ‘मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद’ याचा अर्थ असे की या मातीतील म्हणजेच समाजातील सगळा भेदाभेद मिटून जावा, संपून जावा, असे कवयित्रीला वाटते. म्हणजेच समाजात असलेला गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, जात-धर्म, स्त्री-पुरूष असा विविध प्रकारचा भेदाभेद नष्ट होऊन भेदभावविरहित नव्या समाजाची निर्मिती व्हावी, असे कवयित्रीला वाटते.
प्र. ५. अभिव्यक्ती.
(१) आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हास वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.
उत्तर: भारतात मूल्यशिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानाच्या प्रकाशाने इथला स्वार्थी अंधार नष्ट होईल. तसेच भारतात सर्वत्र शांतता नांदावी म्हणून सर्व धर्मसमभावाचे व्रत प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता जेव्हा बळकट होईल तेव्हाच देशात धर्म भेद लयाला जातील व पुन्हा एकदा भारत साऱ्या जगाला शांतीचा संदेश देईल, असे वाटते.
(२) कवितेचा तुम्हांला समजलेला भावार्थ स्पष्ट करा.
उत्तर: माणसांमध्ये पुन्हा एकदा उत्साह भरून जावा. समाजातील जुन्या, अनिष्ट चालीरिती, रूढी, परंपरा, अन्याय, अत्याचार नष्ट करून त्यातून समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाणारे नवीन विचार निर्माण व्हावेत. समाजातील सगळा भेदाभेद मिटून जावा, संपून जावा, असे कवयित्रीला वाटते. आपली भारतभूमी पुन्हा एकदा प्रखर तेजाने तळपावी, तिची किर्ती सगळ्या जगभर पसरावी, असेच कवयित्रीला वाटते.
अपठित गद्य आकलन.
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
प्र. १. चौकटी पूर्ण करा. (अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचे प्रतीक ………………….
(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचे प्रतीक …………………
(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचे प्रतीक ……………….
उत्तर: (अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचे प्रतीक – प्रकाश, सत्यता व साधेपणा
(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचे प्रतीक – त्याग व नम्रता
(इ) झेंड्याचा हिरवा रंगगुणांचे प्रतीक -हरितश्यामल भूमाता
प्र. २. झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा.
उत्तर: तिरंगाचे तीनही रंग सांस्कृतिक मूल्यांची प्रतीके आहेत. वरचा केशरी रंग हे त्यागाचे प्रतीक आहे; मधला पांढरा रंग हा सुचिता, सत्य व साधेपणाचे प्रतीक आहे; तर खालचा हिरवा रंग हे समृद्धीचे प्रतीक आहे. मधल्या पांढऱ्या रंगाच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे. या चक्राला चोवीस आरे आहेत. यांतून गतिमानता व अखंड सेवा यांचा संदेश दिला आहे.