वाक्यरूपांतरणMarathi Grammar / By Elite Tutors वाक्यप्रकार वाक्यरूपांतरण वाक्य प्रचार समानार्थी शब्द लेखननियमांनुसार लेखन (Class 10) भाषिक घटकांवर आधारित कृती व्याकरण घटकांवर आधारित कृती उपयोजित लेखन: पत्रलेखन उपयोजित लेखन: सारांशलेखन उपयोजित लेखन: जाहिरात लेखन उपयोजित लेखन: बातमी लेखन उपयोजित लेखन: कथालेखन उपयोजित लेखन: निबंधलेखन पुढील वाक्यांत दिलेल्या प्रकारानुसार बदल करा : [(वाक्यरूपांतरण) 2 Marks] The correct spelling (if your page shows different) → Video Explanation of this Grammar Click the question to check your answer प्रवासात भरभरून बोलावे. (आज्ञार्थी करा.) प्रवासात भरभरून बोला. " तू विजयी होऊन यावेस.'' (आज्ञार्थी करा) ” तू विजयी होऊन ये.” पांढरा रंग कोणाला आवडत नाही? (उद्गारार्थी करा.) ओहो! किती आवडतो पांढरा रंग सगळ्यांना ! सर्वांनी रांगेत उभे राहा. (विधानार्थी करा.) सर्वांनी रांगेत उभे राहावे. ताई उंच आहे. (नकारार्थी करा.) ताई बुटकी नाही. काल रात्री केवढा पाऊस पडला! (विधानार्थी करा) काल रात्री खूप पाऊस पडला. किती सुंदर आहे तो देखावा! (विधानार्थी करा.) तो देखावा खूप सुंदर आहे. ताजमहाल खूप सुंदर आहे. (उद्गारार्थी करा.) किती सुंदर आहे ताजमहाल! भारतीय सेना युद्धात पराभूत झाली नाही. (होकारार्थी करा.) भारतीय सेना युद्धात विजयी झाली. शिस्तीने वागावे. (आज्ञार्थी करा.) शिस्तीने वागा. किती उंच आहे हा तालवृक्ष! (विधानार्थी करा) हा तालवृक्ष खूपच उंच आहे. माझी शाळा घराजवळ आहे. (प्रश्नार्थी करा .) तुझी शाळा घराजबळ आहे का? भारतीय सेना युद्धात पराभूत झाली नाही. (होकारार्थी करा) भारतीय सेना युद्धात विजयी झाली. तेल किंवा तळलेले पदार्थ आधी सोडले पाहिजेत. (आज्ञार्थी) तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा. आई रात्रभर झोपली नाही. (होकारार्थी करा) आई रात्रभर जागी होती. कुणाचेही भले करावे. (नकारार्थी करा) कुणाचेही वाईट करू नये. कोण सांगणार युक्ती ? (विधानार्थी करा) कुणीही युक्ती सांगणार नाही. मला हे चित्र पसंत आहे. (नकारार्थी करा) मला हे चित्र नापसंत नाही. संदल दाट असायला हवे. (प्रश्नार्थी करा) संदल दाट असायला नको का? जुनी वस्त्रे धारण करू नयेत. (होकारार्थी करा) नवीन वस्त्रे धारण करावीत. हे काम खूप मोठे आहे. (नकारार्थी करा) हे काम इतके लहान नाही.