(१) उत्कंठा वाढणे – अर्थ : कुतूहल वाढणे.
वाक्य : रमेशला समुद्र पाहण्याची उत्कंठा वाढली.
(२) रममाण होणे – अर्थ : गुंगून जाणे.
वाक्य : शीतल गाण्यात रममाण झाली.
(३) स्वरसाज चढवणे – अर्थ : चाल देणे.
वाक्य : गाण्याला संगीतकाराने स्वरसाज चढवला.
(४) भान ठेवणे – अर्थ : जाणीव ठेवणे.
वाक्य : आपल्याला अभ्यासाचे भान ठेवले पाहिजे.
(५) हातात हात घालणे – अर्थ : सहकार्य करणे.
वाक्य : स्नेहा आणि नेहा अभ्यासात हातात हात घालून मदत करतात.
(६) आर्जव करणे – अर्थ : विनंती करणे.
वाक्य : रमेशने आईला बाहेर खेळायला जाण्यासाठी आर्जव केले.
(७) खूणगाठ बांधणे – अर्थ : निश्चय करणे.
वाक्य : सुनीलने डॉक्टर होण्याची खूणगाठ बांधली.