भाग ३ पाठ – ९. उजाड उघडे माळरानही

प्र. १. (अ) कारणे लिहा.

(अ) कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण ………………

उत्तर:
कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण वसंत ऋतूच्या आगमन झाले आहे.

(आ) जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण ………………

उत्तर:
जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण पळसफुले मातीच्या अंकावरती फुलुन आली.

(आ) खालील आकृतिबंध पूर्ण करा.

उत्तर: 


(इ) पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.

उत्तर:

प्र. २. सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.

उत्तर: 

प्र. ३. खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.

उत्तर: 

प्र. ४. भावार्थाधारित.

(१) ‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.

उत्तर:
वरील काव्यपंक्ती ‘उजाड उघडे माळरानही’ या कवितेतील आहे. या कवितेच्या कवयित्री ‘ललिता गादगे’ आहेत. कवयित्री सांगतात सांबर वृक्ष देखील रानाच्या त्या चिंचोळ्या वाटेवर (पाणंद) दोन्ही बाजूला लाल कळ्यांनी बहरून वसंतऋतूच्या स्वागतासाठी उभे आहेत.

(२) ‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

उत्तर:
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीतील प्रत्येक गोष्टीला अतिशय आनंद झाला आहे. वसंतऋतूच्या आगमनाने उजाड उघडे माळरानही रंगबिरंगी फुलांनी, पानांनी बहरून आलेले आहेत. जणू काही ते माळरानही अतिशय आनंदाने वसंतऋतूचे गीत आनंदाने गात आहे.

प्र. ५. अभिव्यक्ती.

(अ) वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.

उत्तर:
झाडांना नवी पालवी फुटते. पाने फुले बहरतात. वेगवेगळी फुलझाडे विविध रंगांच्या फुलांनी सजतात. वसंतऋतूच्या आगमन होणार म्हणून पक्षीही खुश होतात. त्यांचे कलरव कानी पडतात. कोकिळा कुहू-कुहू करून आपले गाणे सुरू करते. वसंतऋतूत संपूर्ण सजीव सृष्टीत एक नवीन उत्साह व आनंद आपल्याला पहायला मिळतो.

(आ) सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हाला सुचतील असे उपाय लिहा.

उत्तर:
(१) आपण पर्यावरणाला प्रदूषित करू नये.
(२) जीवाश्म इंधनाचा वापर मर्यादित मार्गाने केला पाहिजे.
(३) झाडे लावली पाहिजेत.
(४) झाडे आणि वने संरक्षित केले पाहिजे.
(५) अधिक नूतनीकरणयोग्य ऊर्जा वापरावे.