माझ्या मते भिक्षेकऱ्याने शालीचा केलेला उपयोग त्याच्या परिस्थितीला अनुरूप होता. अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे. ही गरजे भागवण्याकरता भिक्षेकऱ्याने शाली विकण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता. शरीराचे थंडीपासून रक्षण करण्याकरता लेखकाने दिलेल्या शाली भिक्षेकऱ्याला उपयुक्त ठरणार होत्या; मात्र शरीराच्या उबेची गरज ही त्याच्याकरता दुय्यम होती. पोटात भुकेचा डोंब उसळलेल्या त्या भिक्षेकऱ्याला पोटभर अन्नाची अधिक गरज वाटली. त्यामुळे, मागचा पुढचा विचार न करता त्याने त्या शाली विकल्या. त्यातून मिळालेल्या पैशांतून त्याने आपली प्राथमिक गरज भागवली. त्याला जाणवणारी भूक हो त्याला बोचणाऱ्या थंडीपेक्षा अधिक तीव्र होती. त्यामुळे, त्याने घेतलेला हा निर्णय योग्यच होता असे मला वाटते.