पाठ १६. स्वप्न करू साकार

i.    –  क                     ii.    –  ड
iii.    –  ब                   iv.    –  अ

नव्या पिढीचे स्वप्न साकार करायचे आहे.

शेतातील धान्याला मोत्यांची उपमा दिली आहे.

‘स्वप्न करू साकार’ या कवितेत कवी किशोर पाठक यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न चित्रित केले आहे. प्रस्तुत कवितेद्वारे कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकतेचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
      या जगात सर्वत्र ऐश्‍वर्य, वैभव नांदत आहे. त्या ऐश्वर्याचे, संपदेचे आम्ही रक्षण करू, संवर्धन करू, लाखपटीने हे वैभव आम्ही वाढवू, असा आशय वरील काव्यपंक्तींतून व्यक्‍त होतो. आपल्या कर्तृत्वाने जगाचे वैभव वाढवण्याची स्फूर्ती या पंक्‍तींमधून कवी देत आहे. या पंक्ती प्रेरणादायी, सकारात्मक व आत्मविश्वासपूर्ण अशा आहेत.

कवी – किशोर पाठक

कवितेचा विषय – देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न

कवी आपल्या देशाचे वर्णन करताना अभिमानाने सांगतो, की या देशाच्या मातीवरती, या मायभूमीवरती आमचा अधिकार आहे. त्यामुळे, नव्या पिढीचे भारताच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आम्ही प्रत्यक्षात आणू.

‘स्वप्न करू साकार’ या कवितेत कवी किशोर पाठक यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न चित्रित केले आहे. प्रस्तुत कवितेद्वारे कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा व एकीचे बळ या मूल्यांचे महत्त्व ते स्पष्ट करत आहेत. देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपण शेतीचा विकास करून संपन्न होऊया, उद्योगधंद्यांची भरभराट व्हावी म्हणून श्रमशक्‍ती खर्च करूया, एकात्मतेचा मंत्र जपूया आणि या विश्‍वाचे वैभव वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहूया असा संदेश ते देतात.

हे समूहगीत साध्या, सोप्या भाषेत देशातील शेतीसंस्कृती, श्रमांचे महत्त्व व एकता या मूल्यांवर भर देते. आपल्या देशाची भरभराट, विकास होवो असा शुभ विचार व्यक्त करतानाच आपण सर्वांनी या कार्यात पुढाकार घेऊया असा प्रयत्नवादी दृष्टिकोन कवी मांडतात. ही कविता उत्साही भाव व सकारात्मकता निर्माण करते. यमक साधणारी, तालबद्ध रचना असल्यामुळे तो लयीत गाता येते. सर्व देशवासियांना देश घडवण्याची प्रेरणा देणारी ही कविता मला फारच आवडते.

१)  उत्साह
२)  कष्ट, मेहनत
३)  व्यवसाय
४)  सावकाश होणारे ठोस बदल