भाग १ पाठ – ३ शाल

(३) खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा.

(अ) एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते.

उत्तर : लेखकाने बाईला हाक मारून खिडकीतून शाल व पाचपन्नास रुपयांच्या नोटा दिल्या.

(आ) म्हातारा, अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरूण कुडकुडत बसल्याचे पाहिले.

उत्तर : लेखकाने त्याला आपल्याजवळील दोन शाली दिल्या.

(४) कारणे शोधून लिहा.

(अ) एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा जास्त होती, कारण ……
उत्तर : एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा जास्त होती, कारण या घटनेतून लेखकांना परोपकार केल्याचे सुख मिळाले.

(आ) शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही, कारण……
उत्तर : शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही, कारण सुर्वे मुळातच शालीन होते.

(इ) लेखकांच्या मते, शालीमुळे शालीनता जाते, कारण……
उत्तर : लेखकांच्या मते, शालीमुळे शालीनता जाते, कारण सन्मान करण्याच्या रूपाने आपण एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे.

(१२) स्वमत.

(अ) ‘शाल व शालीनता’ यांचा पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर: ‘शाल’ ही प्रतीकात्मक आहे. तर शालीनता ही ‘चरित्रात्मक’ आहे. शालीनता हा एक स्वभावगुण आहे, जो मुळातच व्यक्तीमध्ये असावा लागतो, तर शाल हे सन्मानाचे प्रतीक मानले जाते. व्यक्तीचा गौरव करण्याकरता श्रीफळ व शाल दिली जाते; मात्र या सन्मानाच्या रूपाने व्यक्तीला मिळालेली शाल व शालीनता यांचा संबंध असेलच असे नाही. कवी नारायण सुर्वेही हीच बाब सांगतात. शाल मिळालेली प्रत्येक व्यक्‍ती शालीन असेल किंवा शाल न मिळालेली प्रत्येक व्यक्ती शालीन नसेल असे होत नाही. शाल पांघरून मनाची, आचरणातील शालीनता मिळवता येत नाही. त्याचप्रमाणे मुळातच शालीन असणारी व्यक्‍ती शाल रूपाने सन्मान मिळवतेच असेही नाही; मात्र ती व्यक्‍ती आपल्यातील शालीनता जपून ठेवते. त्यामुळे, ‘शाल आणि शालीनता’ यांचा विशेष संबंध असेलच असे नाही.

(आ) ‘भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग’, याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर: लेखकाने एक म्हातारा भिक्षेकरी ओंकारेश्वराच्या पुलावर थंडीने कुडकुडताना पाहिला, लेखकाला त्याची दया आली व त्याने त्याचे थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपल्याजवळील एक नाही तर दोन शाली दिल्या. पण दोन दिवसापासून भुकेला असलेल्या भिक्षेकऱ्याने शाली विकून आपल्या पोटाची आग विझवली, भूक शांत केली. माणूस श्रीमंत असो की गरीब त्याला जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असतेच. एक वेळ कपडे नसतील, निवारा नसेल तर चालवून घेईल; पण वेळेला खायला हे मिळालेच पाहिजे आणि त्यामुळे भिक्षेकऱ्याने शाली विकून आपल्या पोटाची आग शांत केली हे माझ्या मते योग्यच आहे.

(इ) लेखकाच्या भावना जशा ‘शाल’ या वस्तूशी निगडित आहेत तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडित असलेल्या भावना, तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: मी इयत्ता सहावीत असतानाची गोष्ट. वक्तृत्व स्पर्धेत पहिला आलो, म्हणून आजी -आजोबांनी मला सायकल घेऊन दिली. मला खूपच आनंद झाला होता. आठ दिवसांतच मी सायकल चालवायला शिकलो आणि तेव्हापासून ती माझी सोबतीच झाली. शाळेत, मैदानावर कुठेही जाताना मी माझ्या सायकलशिवाय जाऊच शकत नाही, इतकं माझं तिच्याशी घट्ट नातं जुळलं आहे. आजी आजोबांचे प्रेम, मित्रांसोबत सायकलवरून केलेल्या सहली, धम्माल- मस्ती अशा अनेक आठवणी या सायकलशी जोडल्या गेल्या आहेत, म्हणूनच मी जिव्हाळ्याने तिची काळजी घेतो, देखभालही करतो. अशी ही सायकल माझ्यासाठी फक्त एक वस्तू नाही, तर हक्काची, जीवाभावाची व्यक्तीच झाली आहे.

error: Content is protected !!