भाग 1 पाठ २ (आ) – योगी सर्वकाळ सुखदाता

उत्तर: आशयसौंदर्यः  वरील काव्यपंक्ती ‘योगी सर्वकाळ सुखदाता’ या अभंगातून घेतल्या आहेत. संत एकनाथांनी पाण्याची आणि योग्याची तुलना करून ‘योगी सर्वश्रेष्ठ आहे,’ हे पटवून दिले आहे.

काव्यसौंदर्य: प्रस्तुत ओवीमध्ये योगी पुरुषाची महती गाताना संत एकनाथ म्हणतात- ज्याप्रमाणे मेघांच्या पाण्याने अन्नधान्य उगवते. सर्वलोक तृप्त होतात. त्याप्रमाणे योगी या इहलोकात मानवरूपात जन्म घेतो. त्याच्या आत्मज्ञानाच्या श्रावणाने जनमानसाचा उद्धार होतो.

भाषिक वैशिष्टये: मेघांचे रुपक घेऊन योगी खालुते येतात ही कल्पनाच उच्च आहे. कवींच्या भाषिक वैशिष्ट्यांत येणे, पावणे, कीर्तने, निजज्ञाने या शब्दांमुळे नादमाधुर्य निर्माण झाले आहे.

उत्तर: प्रस्तुत अभंगात योगी पुरुष आणि पाण्याची तुलना  केली असून, योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, हे विविध दृष्टान्तांतून संत एकनाथ यांनी स्पष्ट केले आहे. योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगताना ते म्हणतात – पाण्याने वरवरचा मळ निघतो; पण योग्यांच्या ज्ञानाने अंतर्बाहय निर्मळता होते. पाण्याने एकदा संतुष्टता मिळते आणि परत तहान लागते, पण योगी चिरकाल टिकणारी स्वानंदतृप्ती देतात. उदकाचा म्हणजे पाण्याचा गोडवा फक्त जिभेलाच कळतो पण योग्यांचा गोडवा, त्यांचे ज्ञानाचे शब्द, प्रेम सर्व इंद्रियांना तृप्त करतात. मेघांच्या पाण्याने अन्नधान्य पिकते व जनांची भूक भागते. पण योग्यांच्या कीर्तनाने, निजज्ञानाने जनांचा उद्धार होतो. त्यांचे पूर्ण जीवन सफल होते.

उत्तर: योगी पुरुष आणि पाणी हे दोन्हीही जनकल्याणासाठी झटतात.पाणी तहान शमवते. काही काळापुरती संतुष्टी देते. मेघांच्या पाण्याने शेती पिकते. अन्नधान्य पिकते. सर्वांची भूक भागवली जाते. रसनेला तृप्ती मिळते, मळ घालवते, स्वच्छता करते, योगी पुरुष ज्ञानदानाने लोकांना सुखी समाधानी करतो. त्यांना कायमची तृप्तता देतो. सर्वेंद्रिय तृप्त करतो. मेघांचे पाणी खाली पडून शेती पिकवते. पण योगीपुरुष तर स्वत:च उच्च अवस्थेतून इहलोकात जन्म घेतात. सर्व दीनांना, जनांना, कीर्तन व आत्मज्ञानाने चिरंतर सुख देतात. त्यांच्या जीवनाचा उद्धार करतात. योगीपुरुष आणि पाणी दोघेही समाजासाठी अमूल्य आहेत.

error: Content is protected !!