‘स्वप्न करू साकार’ या कवितेत कवी किशोर पाठक यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न चित्रित केले आहे. प्रस्तुत कवितेद्वारे कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकतेचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
या जगात सर्वत्र ऐश्वर्य, वैभव नांदत आहे. त्या ऐश्वर्याचे, संपदेचे आम्ही रक्षण करू, संवर्धन करू, लाखपटीने हे वैभव आम्ही वाढवू, असा आशय वरील काव्यपंक्तींतून व्यक्त होतो. आपल्या कर्तृत्वाने जगाचे वैभव वाढवण्याची स्फूर्ती या पंक्तींमधून कवी देत आहे. या पंक्ती प्रेरणादायी, सकारात्मक व आत्मविश्वासपूर्ण अशा आहेत.