भाग 1 पाठ २ (अ) – अंकिला मी दास तुझा

पठित पद्य (मुद्द्यांच्या आधारे कृती)
For Appreciation of this Poem (8 Marks) Question Click here

(१) पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.

(अ) माता धावून जाते ……..
उत्तर:
(अ) माता धावून जाते – जेव्हा अग्नित बाळ पडते.

(आ) पृथ्वीवर पक्षिणी झेपावते……..

उत्तर:

(आ) पृथ्वीवर पक्षिणी झेपावते – जेव्हा पिल्लू जमिनीवर पडते.

(इ) गाय हंबरत धावते……..

उत्तर:

(इ) गाय हंबरत धावते – भुकेले वासरू पाहिल्यावर.

(ई) हरिणी चिंतित होते……..

उत्तर:

(ई) हरिणी चिंतित होते – पाडस वणव्यात अडकल्यावर.

(२) आकृती पूर्ण करा.

उत्तर:

(३) कोण ते लिहा.

(अ) परमेश्वराचे दास –

उत्तर:

(अ) परमेश्वराचे दास- संत नामदेव

(आ) मेघाला विनवणी करणारा-

उत्तर:

(आ) मेघाला विनवणी करणारा – चातक

(४) काव्यसौंदर्य

(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.

      ‘सवेंचि झेंपावें पक्षिणी । पिलीं पडतांचि धरणीं ।।

       भुकेलें वत्सरावें । धेनु हुंबरत धांवे ।।’

उत्तर:               

आशयसौंदर्यः वारकरी संप्रदायातील कवी संत नामदेव यांचा ‘अंकिला मी दास तुझा’ हा अभंग आहे. मायेची नित्य पखरण देवाने आपल्यावर करावी हा

आशय या कवितेतून विविध उदाहरणांतून व्यक्त होतो.

काव्यसौंदर्य: प्रस्तुत दोन चरणांमध्ये आपले पिल्लू फांदीवरून पडताना जेव्हा पक्षिणी पाहते तेव्हा त्यांचे रक्षण करताना ती वेगाने जमिनीवर क्षेप घेत पिलाला

वाचवते. तसेच वासरू जेव्ह भुकेले होते, तेव्हा त्या वासराची आई हंबरत त्याकडे धाव घेते. हे उदाहरण देताना संत नामदेव म्हणतात त्याप्रमाणे हे परमेश्वरा तू माझ्या प्रत्येक कार्यात धाव घे.

भाषिक वैशिष्टये: आपल्या नित्याच्या जिवनातील उदाहरणांनी नामदेवांनी साध्या, समर्पक भाषेच्या रचनेतून आपला करूण रस व्यक्त केला आहे.

(आ) आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्‍त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर:
आई म्हणजे देवाचं दूसरं रूप. असं म्हणतात की देव स्वतः या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पाठविले. प्रस्तुत अभंगातून आईच्या प्रेमाची महती सांगताना संत नामदेव सांगतात की, ‘आगीमध्ये जर एखादं बाळ सापडलं तर त्याची दयाळू आई अती व्याकूळ होऊन त्याला वाचवते.’ प्राण्याच्या प्रेमाबद्दल सांगताना संत नामदेव सांगतात की,‘एखाद्या गाईचे वासरू भूकेने व्याकूळ होऊन ओरडत असेल तर ती माता (गाय) त्याच्यासाठी धावून जाते. त्याचप्रमाणे जंगलाला वणवा लागला असेल आणि जर एखाद्या हरिणीचे पाडस त्यात सापडले तर ती हरिणी  त्यास वाचवण्यास अती चिंतातूर होते. त्याचप्रमाणे एखाद्या पक्षिणीचे पिल्लू घरट्यातून खाली जमिनीवर पडले तर ती पक्षिणी त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते असे सांगितले आहे.

 

(इ) संत नामदेवांनी परमेश्‍वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
संत नामदेवांनी श्रीविठ्ठलाला माउली (आई) असे म्हटले आहे. आईची माया जशी तिच्या बाळावर वर्षत असते, तशी मायेची व प्रेमाची पाखर हे देवा, तू माझ्यावर अविरत करावीस, अशी विनंती संत नामदेव या अभंगात करतात. अशी विनवणी करताना त्यांनी खालील उदाहरणे दिली आहेत. आपले पिल्लू फांदीवरून पडताना जेव्हा पक्षिणी पाहते तेव्हा त्यांचे रक्षण करताना ती वेगाने जमिनीवर क्षेप घेत पिलाला वाचवते. तसेच वासरू जेव्ह भुकेले होते, तेव्हा त्या वासराची आई हंबरत त्याकडे धाव घेते. हे उदाहरण देताना संत नामदेव म्हणतात त्याप्रमाणे हे परमेश्वरा तू माझ्या प्रत्येक कार्यात धाव घे.

(ई) पक्ष्याच्या/प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.

उत्तर:

          पक्षी आपल्या पिलांना उडण्यापासून अन्न कसे शोधावे हे शिकवतात. प्राणी आपल्या पिलांना शत्रूपासून धोका कसे टाळावे याची शिक्षणही देतात. बाळ डॉल्फिन पाच वर्षांपर्यंत त्यांच्या आईजवळ राहते. कांगारू आपल्या पिल्लास संकटाच्या वेळी आपल्या पोटात घेते. कोंबडी आपल्या पिल्लांची काळजी घेते. त्यांना चोचीने निवडून धान्य खाऊ घालते.