4. आम्ही महाराष्ट्रकन्या

मराठी स्वाध्याय

आम्हांला हे समजले.

प्र. १. आकृतिबंध पूर्ण करा.
(अ) पहाट भक्तिमय करणाऱ्या
पहाट भक्तिमय करणाऱ्या
संत मुक्ताबाई संत जनाबाई
(आ) स्वातंत्र्याची गीते शिकवणाऱ्या
स्वातंत्र्याची गीते शिकवणाऱ्या
राजमाता जिजाऊ राणी लक्ष्मीबाई
प्र. २. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) कवितेत आलेल्या पर्वताचे नाव काय आहे?
उत्तर

कवितेत सह्याद्री या पर्वताचे नाव आले आहे.

(आ) कवितेत कोणत्या शिखराचे नाव आले आहे?
उत्तर

कवितेत ‘कळसूबाई’ या शिखराचे नाव आले आहे.

(इ) कवितेत कोणत्या नद्यांची नावे आली आहेत?
उत्तर

कवितेत कृष्णा, भीमा व गोदावरी या नद्यांची नावे आली आहेत.

प्र. ३. कवितेतील खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
अवघ्या भारताची सेवा
बाणा आमुचा मराठी,
प्राण तळहातावरी
सर्वांसाठी देशासाठी.
उत्तर

संपूर्ण भारताची व येथील लोकांची सेवा करणे हा आमचा मराठी बाणा आहे. भारतभूमीसाठी व देशबांधवांसाठी आम्ही आमच्या प्राणांचीही पर्वा करणार नाही. अशा समर्पण भावनेने देशाचे रक्षण करू.

प्र. ४. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) खालील ओळी इतिहासातील कोणत्या व्यक्तींच्या पराक्रमांची आठवण करून देतात?
करू हातावरीहि ढाल, बाळ बंधुनिया पाठी.
उत्तर

(१) राजमाता जिजाबाई
(२) राणी लक्ष्मीबाई

(आ) आपण सर्वांना अभिमान वाटेल अशा कोणकोणत्या व्यक्तींचा आणि ठिकाणांचा उल्लेख या कवितेत आहे?
उत्तर
व्यक्ती :
(१) संत मुक्ताबाई
(२) संत जनाबाई
(३) राजमाता जिजाबाई
(४) राणी लक्ष्मीबाई
ठिकाणे :
(१) सह्याद्रीचा कडा
(२) कळसूबाईचे शिखर
(३) नद्या (कृष्णा, भीमा, गोदावरी)
प्र. ५. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी सांगा.
आम्हांला आमची मायमराठी भूमी खूप आवडते.
उत्तर

स्वर्गाहूनीही आम्हांला माया मराठी भूमीची.

खेळू या शब्दांशी

प्र. १. खालील शब्दांचा अकारविल्हे (वर्णमालेनुसार) क्रम लावा.
(अ) कन्या    (आ) माय    (इ) पहाट    (ई) भूमी    (उ) हात
उत्तर
(१) कन्या
(२) पहाट
(३) भूमी
(४) माय
(५) हात
प्र. २. खाली दिलेले शब्द वाचा. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग यांमध्ये शब्दांचे वर्गीकरण करून वहीत लिहा.
मुलगा, पुस्तक, शाळा, पक्षी, मुलगी, शिक्षक, गाय, चेंडू, कुत्रा, मित्र, वाघ, शिक्षिका, वाघीण, बैल, बाळ, घर, फुगा, खुर्ची, पिशवी, विमान, गाव, मोर.
उत्तर
पुल्लिंग – तो स्त्रीलिंग – ती नपुंसकलिंग – ते
मुलगा शाळा पुस्तक
पक्षी मुलगी बाळ
शिक्षक गाय घर
चेंडू शिक्षिका विमान
कुत्रा वाघीण गाव
मित्र खुर्ची
वाघ पिशवी
बैल
फुगा
मोर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!