५. परिमळ

कृती

(१) (अ) कृती करा.

(आ) खालील घटनांचे पाठाचे आधारे परिणाम लिहा.

उत्तर:

(इ) तुलना करा.

उत्तर:

(ई) खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.

(१) शब्दांची मौज वाटेल, अशी बहिणाबाईंनी दिलेली उदाहरणे –
उत्तर:   
(१)  पर्गटले दोन पानं
                   जसे हात जोडीसन
            (२)  हिरवे हिरवे पानं
                   लाल फयं जशी चोच
                   आलं वडाच्या झाडाले
                   जसं पीक पोपटाचं!
            (३)  कडू बोलता बोलता
                   पुढे कशी नरमली
                   कडू निंबोयी शेवटी
                   पिकीसनी गोड झाली!

(२) बहिणाबाईंची प्राणिमात्रांविषयीची कतज्ञता-
उत्तर:  (१) पाय उचल रे बैला, 
               कर बापा आता घाई 
               चालू दे रे रगडनं 
               तुझ्या पायाची पुण्याई 
          (२) मन पाखरू पाखरू
                त्याची काय सांगू मात?
                आता व्हतं भुईवर 
                गेलं गेलं आभायात.

(२) व्याकरण.

(अ) प्रस्तुत पाठात दिलेल्या कवितेच्या उदाहरणांतून यमक जुळणाऱ्या शब्दांच्या पाच जोड्या शोधून लिहा.
उत्तर:   (१) एक-कितीक
           (२) नक्कल-अक्कल
           (३) जीव-हीव
           (४) थंडी-दिंडी
           (५) घाई-पुन्याई

(आ) शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
(१) बावनकशी सोने – मौल्यवान अस्सल सोन्यासारखे
(२) करमाची रेखा – भाग्याची रेखा, नशिबात लिहिलेली प्रत्येक गोष्ट सामावणारी रेखा
(३) सोन्याची खाण – सोन्यासारख्या मौल्यवान गोष्टीचा साठा
(४) चतकोर चोपडी – अगदी लहान आकाराची वही.

(इ) खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
(१) तोंडात बोटे घालणे –
अर्थ – आश्‍चर्य व्यक्‍त करणे.
वाक्य – माथेरानला सूर्योदयाचे अप्रतिम दृश्य पाहून सुमनने तोंडात बोटे घातली .
(२) तोंडात मूग धरून बसणे –
अर्थ – गप्प बसणे, काहीही न बोलणे.
वाक्य – शिक्षकांनी प्रश्‍न विचारताच श्रीधर तोंडात मूग धरून बसला .

(ई)  खालील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा.
       उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी
(अ)  अर्थ – अर्थपूर्ण, अर्थहीन, अनर्थ, निरर्थक
(आ) कृपा – कृपाभिलाषी, अवकृपा, गुरुकृपा, ईशकृपा, कृपाहीन, श्रीकृपा, कृपाळ, कृपावंत
(इ)   धर्म – अधर्म, स्वधर्म, परधर्म, धर्मी, धर्मज्ञ, धर्माचार
(ई)   बोध – सुबोध, दुर्बोध, बोधपर, बोधपूर्ण, बोधिसत्त्व
(उ)   गुण – सगुण, अवगुण, दुर्गुण, सद्गुण, गुणवान, गुणी, निर्गुण, गुणज्ञ, गुणवंत

(३) स्वमत.

(अ) ‘बहिणाबाईंचे साहित्य जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे आहे,’ हे लेखकाचे विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर: अत्रे यांनी बहिणाबाईंच्या कविता वाचल्या आणि ते प्रचंड प्रभावित झाले. ‘ स्मृतिचित्रे’ या साहित्यकृतीइतकी ती श्रेष्ठ साहित्यकृती आहे, असे त्यांचे मत झाले. बहिणाबाईंची प्रतिभा त्यांच्या कवितेतल्या शब्दाशब्दांतून पाझरत राहते. इतके सोज्वळ, इतके निर्मळ काव्य मराठी साहित्यात क्वचितच दिसते, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.
    बहिणाबाई या निरक्षर, अशिक्षित होत्या. मग त्यांना उत्तम काव्य लिहिता कसे येईल? असा प्रश्‍न काही जणांना पडू शकतो. त्याचे उत्तर लेखकांनी देऊन टाकले आहे. शिक्षण आणि प्रतिभाशक्ती यांचा काडीइतकाही संबंध नाही. बहिणाबाईंच्या काव्यावरून हे स्पष्टपणे दिसून येते. त्या ग्रामीण भागात राहत होत्या. घरकाम आणि शेतीकाम यांपलीकडे त्यांना काहीही येत नव्हते. तरीही त्यांनी श्रेष्ठ दर्जाचे काव्य निर्माण केले.
    बहिणाबाई अशिक्षित होत्या आणि त्यांना फक्त बोलीभाषाच येत होती, म्हणून त्यांचे काव्य जुन्यांच्या रांगेत बसवले तरी ते चमकून उठते. बरे, त्यांचे काव्य आधुनिकांच्या रांगेत ठेवले, तरी तेथेही ते झळाळून उठते; इतका त्यांच्या काव्याचा दर्जा उच्च आहे. त्यांना माणसांच्या साध्या कृतींतून, वागण्यातून माणसाच्या स्वभावातील, त्याच्या प्रवृत्तीतील विपरीतता दिसून येते. निसर्गातील साध्या साध्या घटकांच्या दर्शनातून त्यांना परमेश्वराचे दर्शन घडते. त्यांच्या काव्याच्या या सामर्थ्यामुळे वाचकाला नैतिक मार्गदर्शन मिळते. म्हणूनच बहिणाबाईंचे काव्य नव्या-जुन्या सर्व प्रकारच्या काव्यांमध्ये स्वतःच्या तेजाने झळाळून उठते.

(आ) ‘बहिणाबाई शेताला निघाल्या, की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर.’, या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
उत्तर: बहिणाबाईंकडे असामान्य काव्यप्रतिभा होती. ग्रामीण जीवन व कृषिजीवन यांच्याशी निगडित संस्कृतीचे बहिणाबाईंच्या मनावर खोल संस्कार झाले होते. त्यामुळे ग्रामीण भावजीवन आणि कृषिजीवन यांचे अर्थपूर्ण व भावपूर्ण तपशील त्यांच्या कवितांत सहज आढळतात. या तपशिलांच्या साहाय्याने त्या माणसाच्या अंतरंगातील विसंगत व विपरीत वृत्ती -प्रवृत्तींवर बोट ठेवतात. माणूस काय गमावत चालला आहे आणि त्याने काय कमावले पाहिजे, हे त्या कळकळीने सांगतात.
    बहिणाबाईंच्या काव्याचा सर्वप्रथम कोणता गुण जाणवत असेल, तर तो म्हणजे सहजता हा होय. कोकीळ पक्ष्याने तोंड उघडले की, आपोआपच संगीत वाहू लागते. फुलांमधला सुगंध नैसर्गिक ऊर्मीतून सहज दरवळतो. बहिणाबाई या निसर्गाशी इतक्या समरस झाल्या आहेत की, निसर्गाच्या सगळ्या प्रेरणा, ऊर्मी त्यांच्या शब्दाशब्दांतून सहज उचंबळून येतात. त्यांना काव्यलेखनासाठी वेगळी समाधी लावून बसावे लागत नाही किंवा वेगळ्या मन:स्थितीची त्यांना गरज वाटत नाही. घरात किंवा शेतात त्या नित्याची कामे करत असतात तेव्हा, किंवा निसर्गाची विविध रूपे सहज नजरेस पडतात तेव्हा त्यांच्या ओठांतून सहज कवितांच्या ओळी बाहेर पडतात. जात्यामधून धान्याचे पीठ जितके सहजगत्या बाहेर पडते, तितके सहजगत्या त्यांच्या ओठांतून शब्द बाहेर पडतात. त्यांच्या कवितेला निसर्गाचीच लय आपसूक लाभलेली आहे. जितक्या सहजतेने आपण श्वास घेतो इतक्या सहजतेने त्यांची कविता निर्माण होते. असे वाटते की काव्य जणू काही बहिणाबाईंच्या ओठातून बाहेर पडण्याची वाटच पाहत असते. म्हणून लेखक म्हणतात की, बहिणाबाई शेताला निघाल्या की काव्य आपले निघालेचे त्यांच्याबरोबर!

(इ)‘मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!’ या उद्गारातून व्यक्‍त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर: निसर्गात प्राणी-वनस्पती सहकार्याने राहतात. त्यांच्यामध्ये हाव दिसून येत नाही. हिंस्र म्हटले जाणारे वाघ-सिंहसुद्धा आपले एका वेळेचे पोट भरण्यापुरतीच हिंसा करतात. पोट भरलेले असताना ते आजूबाजूला वावरणाऱ्या सशालासुद्धा हात लावत नाहीत. कधी एकदा आपण भुकेलेल्या लोकांच्या पोटात जातो, त्यांची भूक भागवतो, असे पिके, फळे यांना वाटत असते. माणूस मात्र याविरुद्ध वागताना दिसतो.
     माणूस अतोनात स्वार्थी बनलेला आहे. पोट भरल्यानंतरही तो तृप्त होत नाही. त्याची हाव वाढतच जाते. स्वार्थीपणामुळे तो खोटेनाटे व्यवहार करतो. आपल्याच लोकांशी लबाडीने वागतो. सरळपणाने व्यवहार करण्याऐवजी फसवणूक करण्याचा विचार करतो. या प्रवृत्तीमुळे जगभर भांडणतंटे, मारामाऱ्या, युद्धे होत आहेत. जगातला सगळा चांगुलपणा नष्ट झाला आहे. माणसे दुःखाच्या खाईत लोटली गेली आहेत. लोक आनंद उपभोगण्याऐवजी यातना भोगत आहेत.
    लोकांनी चांगलेपणाने जगावे, तरच सर्व मानवी समाज सुखी-आनंदी होईल. साधी गाईंगुरे खाल्लेल्या चाऱ्याबद्दल दूध देतात. माणसाचा वाईटपणा पाहून बोरी-बाभळींच्या अंगावर काटे येतात. तरीही त्या माणसांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या शेताभोवती कुंपणासारख्या उभ्या राहतात. माणसाकडे मात्र अशी कृतज्ञता नाही. खरेतर, पोट कितीही भरते, रोज रोज भरले, तरी ते रिकामे होतेच. ज्या देहाचे चोचले पुरवण्यासाठी आपण दिवसरात्र धडपडतो, तो देहसुद्धा एक दिवस नष्ट होतो. मग उरते काय? हृदयांचे देणेघेणे. शुद्ध निःस्वार्थी प्रेमाखेरीज दुसरे चांगले, उदात्त असे या जगात काही नाही. यातच माणूसपणा आहे. पण माणूस ते विसरून गेला आहे. म्हणून बहिणाबाई माणसाला आर्तपणे विनवणी करत आहेत, “हे माणसा, तुला जन्म माणसाचा मिळालेला आहे. पण तू खर्‍या अर्थाने माणूस कधी होणार ?”

(४) अभिव्यक्ती.

(अ) प्र. के. अत्रे यांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर: ‘परिमळ’ हा पाठ वाचल्यावर अत्रे यांच्या भाषेचा एक गुण प्रथमच ठळकपणे जाणवतो. तो म्हणजे त्यांची साधी, सोपी, सरळ भाषा. भाषेत कुठे कठीणपणा, खडबडीतपणा आढळणार नाही. ही अस्सल मराठी भाषा आहे. या पाठात कुठेही एकही कठीण शब्द आढळणार नाही. त्यांचे लेखन वाचताना कोणताही वाचक अडखळणार नाही. आपले लेखन प्रभावी व्हावे; भारदस्त, उच्च दर्जाचे वाटावे म्हणून त्यांनी कुठेही भारदस्त बोजड शब्दांचा वापर केलेला नाही. आपले लेखन लोकांना भारदस्त वाटावे, यापेक्षा आपले लेखन लोकांना कळले पाहिजे, ही त्यांची उत्कट इच्छा आहे. त्यामुळे त्यांची भाषा सर्वसामान्य वाचकांना सहज कळेल अशी आहे. हे त्यांचे फार मोठे सामर्थ्य आहे.
    अत्रे यांच्या लेखाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य सांगितले पाहिजे; ते म्हणजे त्यांची भाषा ही लिहिल्यासारखी नाही, तर ती बोलल्यासारखी आहे. ते वाचकांशी संवाद साधू पाहतात. वाचकांना काही तरी सांगायचे आहे, अशी त्यांची भावना असते. यामुळे वाचकांशी एक प्रकारची जवळीक निर्माण होते. वाचकांशी संवाद साधायचा असल्याने त्यांची भाषा आपोआपच ओघवती बनते. बहिणाबाईंच्या कविता त्यांना प्रचंड आवडल्या आहेत. म्हणून ते त्यांची मुक्‍तकंठाने प्रशंसा करत आहेत.
    प्र. के अत्रे यांच्या लेखनाचा आणखी एक विशेष लक्षात घ्यायला हवा. त्यासाठी सोपानदेव चौधरी यांच्याबरोबर झालेली त्यांची भेट आठवून पाहा. सोपानदेवांचा लाजाळूपणा, स्वत:च्या आईची कविता भीतभीतच वाचून दाखवणे, अत्रे यांनी कवितेची वही खसकन त्यांच्या हातातून काढून घेणे, त्यातल्या कविता अधाशीपणाने वाचणे, मग सोपानदेवांना ओरडून सांगणे या सर्व कृतींमधून एक प्रकारचा अनौपचारिकपणा दिसून येतो. त्यमुळे अत्रे आत्मीयतेने बोलत आहेत, असे जाणवत राहते. त्यांनी बहिणाबाईंच्या कवितेचे मोठेपण जाणले आहे. पण ते त्यांनी कसे सांगीतले आह, ते मी येथे नोंदवले आहे.

(आ) बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर: बहिणाबाईंचे काव्य म्हणजे निसर्ग, पाऊस, मानवी नातेसंबंध इत्यादींवर साध्या, सरळ, सोप्या भाषेत केलेले भाष्य होय. त्यांचे काव्य म्हणजे केवळ वर्णन नव्हे, तर त्याला तत्त्वज्ञानाचे अनेक पैलूही लाभले आहेत. त्यांचे काव्य हे निसर्गवर्णन, शब्दचित्र, व्यक्तिचित्र, विडंबन, विनोद, उपदेश इत्यादी सर्व विषयांना आपल्यामध्ये सामावून घेणारे आहे. यात भावनांचा उत्तम आविष्कार साधला असून कल्पनेची भरारी इतर साहित्याला लाजवणारी आहे. त्यांच्या काव्याची सुलभता त्यातून मांडलेले विचार संपूर्ण मानवी समाजाकरता मार्गदर्शक आहेत. बहिणाबाईंच्या कविता चित्रदर्शी असून त्या संपूर्ण प्रसंगाचे, घटनेचे वर्णन करतात. या कवितांना गेयता लाभली आहे. पाठात दिलेल्या काव्यांमध्ये उपमा, अतिशयोक्ती आणि चेतनगुणोक्ती अलंकारांचा वापर केलेला दिसतो. उदा. ‘ऊन वाऱ्याशी खेयता एका एका कोंबातून पर्गटले दोन पानं, जसे हात जोडीसन’ यातून झाडांवर मनुष्य असल्याचा आरोप करून आणि ‘हिरवे हिरवे पानं लाल फयं जशी चोच, आलं वडाच्या झाडाले जसं पीक पोपटाचं’ या काव्यातून झाडांवर पक्षी असल्याचा आरोप करून त्यांनी चेतनगुणोक्ती अलंकार साधला आहे. मानवी मनाला दिलेल्या पाखराच्या उपमेने विलक्षण आशयसौंदर्य निर्माण केलेले दिसते. योग्य ठिकाणी यमक साधून त्यांनी काव्याचे सौंदर्य वाढवले आहे. बहिणाबाईंचे काव्य उपहासात्मक विनोदी स्वरूपाचेही आहे. त्यातून समाजाची कानउघडणी करणे, माणसाला शहाणे बनवणे असे उद्देश्य त्या साध्य करताना दिसत आहेत. बहिणाबाईंचा खानदेशी वऱ्हाडी बोलीमधील साधेपणा, गोडवा हा अवर्णनीय आहे. त्यांच्या मधुर भाषेत त्यांनी ‘मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस?’ असा प्रश्‍न विचारून मानवतेचे महत्त्व वर्णिले आहे. त्याचबरोबर माणूस व प्राण्यांची तुलना करून मानवाला त्या सत्यस्थितीची जाणीव करून देतात. त्यांनी काव्यातून भूतदया, करुणा, कृतज्ञता इत्यादी मूल्ये अधोरेखित केली आहेत. त्यांच्या या काव्याची व्याप्ती शब्दांत एकवटणे अवघड होऊन बसते.

(इ) माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.
उत्तर: दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माणुसकीचा झरा अजूनही वाहतो आहे याची जाणीव करून देणारा हा प्रसंग होता. वेळ सकाळी दहाची. ठिकाण ठाणे रेल्वेस्थानक. प्रत्येक जण लोकलगाडी गाठण्यासाठी धावत होता. घड्याळाच्या काट्यानुसार पडणारी पावले अधिक वेगाने सरकत होती. कोणाकडे पाहायलाही कुणाला वेळ नव्हता. एकाएका मिनिटासाठी स्वत:च्याच आयुष्याशी चाललेला संघर्ष जिंकण्याच्या प्रयत्नात प्रत्येक जण होतो. अशातच मी आजीला आणण्यासाठी स्टेशनला आलो होतो. अचानक एके ठिकाणी महिला डब्याच्याजवळ काहीसा गोंधळ ऐकू आला. घोळका जमला होता. आजीची गाडी उशिरा येणार होती. मी जाऊन पाहिले तेव्हा एक काकू अचानक बेशुद्‌ध पडल्या होत्या. त्या एकट्याच होत्या. त्यांची परिस्थिती गंभीर वाटत होती; पण जवळच्या बायकांनी मिळून त्यांना फॅनखाली आणून बसवले. काही जणी त्यांना वारा घालत होत्या. पाण्याच्या दोन-तीन बाटल्याही पुढे सरसावल्या. वेळेची, ऑफिसला पोहोचण्याची पर्वा न करता त्या साऱ्याजणी त्या आजारी बाईंसोबत होत्या. त्यातील एका बाईने जाऊन स्टेशन मास्तरांना याची खबर दिली; पण स्ट्रेचर येईपर्यंत वेळ जाईल या विचाराने त्यातील चार बायकांनी तिला उचलले व नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. तात्काळ इलाज मिळाल्यामुळे त्या काकू वाचल्या होत्या. डॉक्टरांनी या साऱ्या महिलामंडळाचे कौतुक केले. त्या काकूंनीही साऱ्यांचे आभार मानले. मानवता हरवत चाललेल्या या समाजात मला मानवतेचे दर्शन झाले होते. त्या खऱ्या अर्थाने माणसं असलेल्या महिलांना सलाम करून मी तेथून आजीला आणायला निघालो.

error: Content is protected !!