7. आजोबांचा तीन पुडांचा डबा

मराठी स्वाध्याय

आम्हांला हे समजले.

प्र. १. खालील चौकटी पूर्ण करा.
(अ) पाठात आलेले डब्याचे प्रकार –
पाठात आलेले डब्याचे प्रकार स्टीलचा डबा प्लास्टिकचा डबा
(आ) पाठातील संवाद करणाऱ्या व्यक्ती –
पाठातील संवाद करणाऱ्या व्यक्ती यश आजी
प्र. २. थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) यशला आजोबांचा डबा भारी का वाटला?
उत्तर

यशला एकावर एक असे तीन डबे असलेला वेगळ्या आकाराचा डबा दिसला. त्याने यापूर्वी असा डबा पाहिला नव्हता. म्हणून त्याला आजोबांचा डबा भारी वाटला.

(आ) यश शाळेसाठी दरवर्षी नवीन डबा का वापरतो?
उत्तर

यशचे प्लास्टिकचे डबे खराब होत, तुटत किंवा त्यांची झाकणे सैल होत. त्यामुळे तो शाळेसाठी दरवर्षी नवीन डबा वापरतो.

प्र. ३. पाठातील घटना योग्य क्रमाने लावा.
उत्तर
(१)
यश आजीला कपाट आवरायला मदत करीत होता.
(२)
कपाटात त्याला एक वेगळ्या आकाराचा डबा दिसला.
(३)
स्टीलचा डबा बरीच वर्षे टिकतो, हे यशला समजले.
(४)
यशने मनात पक्के ठरवले, यापुढे प्लास्टिकचा डबा कधीच वापरायचा नाही.
🤔

विचार करा व सांगा.

प्र. १. तुमच्या घरी तुम्ही प्लास्टिकच्या कोणकोणत्या वस्तू वापरता. त्याऐवजी कोणत्या पर्यायी वस्तू वापरता येतील याविषयी विचार करून यादी तयार करा.
उत्तर
प्लास्टिकच्या वस्तू पर्यायी वस्तू
प्लास्टिकची पिशवी कापडी पिशवी
प्लास्टिकचा डबा स्टीलचा डबा
प्लास्टिकची बाटली स्टीलची बाटली
प्लास्टिकचा कप काचेचा कप
प्लास्टिकची ताटली स्टीलची ताटली
प्र. २. प्रस्तुत पाठातून मिळालेला संदेश सारांश स्वरूपात सांगा.
उत्तर

‘आजोबांचा तीन पिढ्यांचा डबा’ या पाठातून प्लास्टिक पर्यावरण, पक्षी, प्राणी आणि माणसांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, हा संदेश मिळतो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करून स्टीलसारख्या टिकाऊ वस्तू वापराव्यात. पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन निसर्गाचे रक्षण करावे.

🗣️

चर्चा करू या.

प्र. १. खाद्यपदार्थांसाठी प्लास्टिकचा डबा वापरणे घातक आहे, याविषयी आईवडिलांशी चर्चा करा.
उत्तर
प्लास्टिकच्या डब्यात गरम खाद्यपदार्थ ठेवणे आरोग्यासाठी चांगले नाही. प्लास्टिकचे डबे लवकर खराब होतात आणि पर्यावरणालाही हानी पोहोचवतात. त्यामुळे खाद्यपदार्थांसाठी स्टील किंवा काचेचे डबे वापरणे अधिक योग्य आहे.
प्र. २. तुमच्या घरातील प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल याबाबत गटात चर्चा करा.
उत्तर
प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी मी बाजारात जाताना कापडी पिशवी वापरेन. प्लास्टिकच्या डब्यांऐवजी स्टीलचे डबे आणि प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टीलच्या बाटल्या वापरेन. एकदाच वापरून फेकून द्यायच्या प्लास्टिकच्या वस्तू टाळेन. घरातील इतरांनाही प्लास्टिकचा वापर कमी करण्यास सांगेन.

लिहिते होऊ या.

स्टीलचा डबा वापरण्याचे फायदे
उत्तर
स्टीलचा डबा वापरण्याचे फायदे स्टीलचा डबा बरीच वर्षे टिकतो. डबा तुटला तरी वितळवून नवीन डबा तयार करता येतो.
‘पर्यावरण रक्षण’ या विषयावर दोन घोषवाक्ये तयार करा व लिहा.
उत्तर
(१) झाडे लावा, पर्यावरण वाचवा.
(२) प्लास्टिक टाळा, निसर्ग सांभाळा.
पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने तुमच्या शाळेत/परिसरात आयोजित कार्यक्रमाची मुद्देसूद व क्रमबद्ध माहिती देणारा परिच्छेद लिहा.
उत्तर

आमच्या शाळेत पर्यावरण दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ केला. त्यानंतर शाळेच्या आवारात विविध झाडांची रोपे लावली. शिक्षकांनी झाडांचे महत्त्व, प्रदूषणाचे दुष्परिणाम आणि पर्यावरण रक्षणाची गरज समजावून सांगितली. विद्यार्थ्यांनी पर्यावरणविषयक घोषवाक्ये सांगितली व प्लास्टिकचा वापर टाळण्याची शपथ घेतली. तसेच लावलेल्या रोपांची नियमित काळजी घेण्याचे ठरवले. या कार्यक्रमातून सर्वांना पर्यावरण स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश मिळाला.

खेळू या शब्दांशी

प्र. १. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
(अ) नदी – उत्तर : सरिता
(आ) झाड – उत्तर : वृक्ष
(इ) जमीन – उत्तर : धरती
(ई) पक्षी – उत्तर : खग
प्र. २. खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.
(अ) थक्क होणे –
अर्थ : आश्चर्य वाटणे, नवल वाटणे.
वाक्य : सुंदर चित्र पाहून मी थक्क झालो.
प्र. ३. खालील वाक्यातील विरामचिन्हे शोधून त्यांची नावे लिहा.
“अरे, मग तो तुटका डबा कुठे असेल आता?”, आजी म्हणाली.
उत्तर
(१) “ ” – दुहेरी अवतरणचिन्ह
(२) , – स्वल्पविराम
(३) ? – प्रश्नचिन्ह
(४) . – पूर्णविराम
प्र. ४. खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा.
(अ) आभाळमाया –
उत्तर : आभाळ, माया, आभा, आळ, भाळ, माळ
(आ) भाजीपाला –
उत्तर : भाजी, पाला, भाला
प्र. ५. मराठी भाषेतील स्वरांची व व्यंजनांची एकूण संख्या सांगा.
उत्तर

स्वर – चौदा (१४)
व्यंजने – छत्तीस (३६)
स्वरादी – दोन (२)
संयुक्त व्यंजने – दोन (२)

प्र. ६. खालील चौकटीतील स्वर व व्यंजने ओळखा. त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) चौकटीत एकूण किती स्वर आले आहेत? ते कोणकोणते?
उत्तर

चौकटीत एकूण ५ स्वर आले आहेत.
अ, इ, उ, ओ, औ

(आ) चौकटीतील व्यंजनांपासून तयार होणारे अर्थपूर्ण शब्द लिहा.
उत्तर

कर, बस, चल, फळ, रस, पळ.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!