8. नव्या युगाची गाणी

मराठी स्वाध्याय

आम्हांला हे समजले.

प्र. १. खालील स्वर काय म्हणतात, ते लिहा.
सा
आपण सगळे एकमेकांचे साथी आहोत. कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नका.
रे
झोपू नका, वेळ वाया घालवू नका. सतत आपले काम करा.
मनात अभिमान (गर्व) बाळगू नका. त्याने स्वतःचे व समाजाचे नुकसान होते.
माणसाला माणसाशी जोडणारी माणुसकी जपा.
प्र. २. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) एकमुखाने कशाची गाणी गायची आहेत?
उत्तर

एकमुखाने नव्या युगाची गाणी गायची आहेत.

(आ) समानतेचा धर्म शिकवणारा सूर कोणता?
उत्तर

समानतेचा धर्म शिकवणारा ‘ध’ हा सूर आहे.

(इ) ‘म’ हा सूर काय म्हणतो आहे?
उत्तर

‘म’ हा सूर मानवतेचा मंत्र शिका, असे म्हणतो आहे.

(ई) ‘नि’ हा सूर काय म्हणतो आहे?
उत्तर

‘नि’ हा सूर तुमचे मन नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा, असे म्हणतो आहे.

🤔

विचार करा व सांगा.

प्र. १. खालील विधानांबाबत तुमचे मत मांडा.
(अ) परिश्रम हाच यशाचा मार्ग आहे.
उत्तर

जीवनात यश मिळवण्यासाठी मेहनत करणे आवश्यक आहे. परिश्रम केल्याने आपले ध्येय साध्य करता येते. म्हणून परिश्रम हाच यशाचा मार्ग आहे.

(आ) मानवता हाच खरा धर्म आहे.
उत्तर

सर्व माणसांशी प्रेमाने आणि समानतेने वागणे हीच मानवता आहे. गरजू लोकांना मदत करणे व सर्वांचा आदर करणे हा खरा धर्म आहे.

लिहिते होऊ या.

प्र. १. कवितेतील खालील शब्दांचा वापर करून सहा ते आठ ओळींची कविता तयार करा व लिहा.
गाणी, सुंदर, परिश्रम, सूर.
उत्तर
सुंदर आहे आपली दुनिया,
आनंदाची गाऊ गाणी.
परिश्रम करू रोज आपण,
यश मिळवू सारेजण.
प्रेमाचा लावू गोड सूर,
दुःख ठेवू सदा दूर.
एकमेकांना मदत करू,
सुंदर जीवन आपण घडवू.
प्र. २. या कवितेतील विचार तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर

या कवितेत संगीताच्या सात सुरांतून चांगली शिकवण दिली आहे. सर्वांनी भेदभाव विसरून एकत्र यावे आणि प्रामाणिकपणे काम करावे. मनात अहंकार न ठेवता सर्वांशी प्रेमाने व समानतेने वागावे. माणुसकी जपावी आणि आपले मन नेहमी स्वच्छ व पवित्र ठेवावे. एकजुटीने उज्ज्वल भविष्य घडवावे, हा विचार या कवितेतून मिळतो.

खेळू या शब्दांशी

प्र. १. ‘ता’ हा प्रत्यय लावून विविध शब्द तयार करा.
उदा., समान – समानता
उत्तर
‘ता’ प्रत्यय महान – महानता सुंदर – सुंदरता नम्र – नम्रता मधुर – मधुरता स्वतंत्र – स्वतंत्रता शुद्ध – शुद्धता
प्र. २. खालील शब्दांचा वापर करून वाक्ये तयार करा.
(अ) सदैव –
उत्तर : आई-वडील सदैव आपल्या पाठीशी उभे असतात.
(आ) निर्धार –
उत्तर : आम्ही झाडे लावण्याचा निर्धार केला.
(इ) परिश्रम –
उत्तर : खूप परिश्रम केल्यामुळे तो डॉक्टर झाला.
(ई) ज्योत –
उत्तर : ज्ञानाची ज्योत आपण आपल्या मनात लावली पाहिजे.
प्र. ३. खाली काही कवींची व कवयित्रींची नावे उलटसुलट क्रमाने दिली आहेत. ती वाचा व योग्य क्रमाने लावून चौकटीत लिहा.
(अ) ता शे के शां ळ
उत्तर : शांता शेळके
(आ) वी बा क ल
उत्तर : बालकवी
(इ) इं रा दि त सं
उत्तर : इंदिरा संत
(ई) श मं पा गे र ड गा व क
उत्तर : मंगेश पाडगावकर
(उ) चौ री ई ब णा हि ध बा
उत्तर : बहिणाबाई चौधरी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!